Assembly Election Results 2021: ‘EVM वर बंदी घाला लोकशाही वाचवा’; सोशल मीडियात जोरदार ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 10:57 AM2021-05-02T10:57:39+5:302021-05-02T10:58:16+5:30

Assembly Election Results 2021: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात देखील झाली आहे.

assembly election results 2021 ban evm save democracy hashtag trends on social media | Assembly Election Results 2021: ‘EVM वर बंदी घाला लोकशाही वाचवा’; सोशल मीडियात जोरदार ट्रेंड

Assembly Election Results 2021: ‘EVM वर बंदी घाला लोकशाही वाचवा’; सोशल मीडियात जोरदार ट्रेंड

googlenewsNext

Assembly Election Results 2021: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात देखील झाली आहे. मतमोजणीला सुरुवात होण्याआधीपासूनच सोशल मीडियात ईव्हीएम मशिनविरोधातील हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार होत असल्याचे आरोप विरोधकांकडून याआधीही केले आहेत. (assembly election results 2021 ban evm save democracy hashtag trends on social media)

आज पुन्हा एकदा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम बंदीची मोहीम सोशम मीडियात राबवली जाताना दिसत आहे. #BanEVM_SaveDemocracy हा हॅशटॅग ट्विटरवर जोरदार ट्रेंड होताना दिसतोय. अनेकांनी ईव्हीएमवर निवडणुका घेणं बंद करण्याचं आवाहन केलं आहे. ईव्हीएममध्ये फेरफार करुन जनतेच्या मतांचा अनादर केला जात आहे. सर्व निवडणुकांमध्ये फिक्सिंग होत आहे, लोकशाहीचा गळा घोटला जात आहे अशी विविध मतं नेटिझन्स व्यक्त करत आहेत. 

देशातील लोकशाही वाचवायची असेल तर ईव्हीएमवर बंदी घालणं गरजेचं आहे, असंही अनेकांनी म्हटलं आहे. तर एका नेटिझनने ईव्हीएमवर बंदी का घातली पाहिजे याची काही कारणं सांगितली आहेत. यामध्ये परदेशातील निवडणुकांचे दाखले देण्यात आले आहेत. 

 

 

Web Title: assembly election results 2021 ban evm save democracy hashtag trends on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.