शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

'पराभवाच्या फेऱ्यां'त अडकलेल्या ममता बॅनर्जींची 'दीदीगिरी', आठव्या फेरीत मागे पडले अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 2:03 PM

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: पोस्टल मतदान मोजणीवेळी ममता यांना त्यांचे जुने सहकारी सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी  ममता यांना मागे टाकण्यास सुरुवात केली होती. पहिल्या फेरीत ममता या १५०० मतांनी पिछाडीवर होत्या. हळूहळू ही पिछाडी वाढत 8000 वर गेली होती. यामुळे तृणमूलच्या गोटात कमालीची शांतता पसरली होती.

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ((Mamata banrejee)) यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसने (TMC) विधानसभा निवडणुकीत (West Bengal Election Result) सत्ता स्थापनेकडे कूच सुरु केली आहे. अद्याप कोणत्याही जागेचा निकाल हाती आलेला नसून तृणमूलला जवळपास 205 जागांवर बहुमत मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे पक्ष जिंकत असताना ममता बॅनर्जी यांची जागा धोक्यात आली होती. भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना मतमोजणीच्या सातव्य़ा फेऱ्यांपर्यंत झुंझवत ठेवले होते. मात्र, अखेर ममता यांना आघाडी मिळाली आहे. (Mamata banerjee leading after long time; Bjp's Suvendu adhikari trailing in Nandigram Election)

West Bengal Election Result 2021 Highlights: खेला होबे की खेळ संपणार? देशभरातील ५ राज्यांच्या ८२२ जागांना फक्त नंदीग्रामची एक सीट भारी

West Bengal Results 2021:पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा नाही, डाव्यांचा खेळ खल्लास; भाजपाला मतदारांनी दिला 'चकवा'

पोस्टल मतदान मोजणीवेळी ममता यांना त्यांचे जुने सहकारी सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी  ममता यांना मागे टाकण्यास सुरुवात केली होती. पहिल्या फेरीत ममता या १५०० मतांनी पिछाडीवर होत्या. हळूहळू ही पिछाडी वाढत 8000 वर गेली होती. यामुळे तृणमूलच्या गोटात कमालीची शांतता पसरली होती. भाजपाला सुरुवातीला समसमान आघाडी मिळत असल्याने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. मात्र, हळूहळू टीएमसीने मोठ्या अंतराने भाजपाला मागे टाकले आणि भाजपाचा हा उत्साह मावळला. टीएमसी जिंकत असल्याचे दिसत असताना दुसरीकडे ममतांच्या नंदीग्रामवर साऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले होते. 

ममता बॅनर्जी यांनी आठव्या फेरीत सुवेंदू अधिकारी यांचे लीड जवळपास निम्म्याने कमी केले. नंतर अल्पशा मतांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर आघाडी घेतली होती, नंतर थोड्या वेळाने त्यांनी जवळपास 2700 मतांनी आघाडी मिळविली आहे. आता ममता ही आघाडी टिकवतात की सुवेंदू पुन्हा बाजी मारतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021BJPभाजपा