शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2021: मुस्लिम बहुल भागात मिळाला 'भोपळा', भाजपाने अल्पसंख्याक मोर्चा विसर्जितच करून टाकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 19:42 IST

Assam Assembly Election 2021: आसाममध्ये भाजपाला बहुमतासह विजय मिळाल्यानंतरही पक्षाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला संमिश्र यश मिळाले होते. (Assam Assembly Election 2021 )आसाम आणि पाँडेचेरीमध्ये भाजपाचा विजय झाला. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मात्र आसाममध्ये भाजपाला बहुमतासह विजय मिळाल्यानंतरही पक्षाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. ( 'zero' got in Muslim-majority areas, Assam BJP dissolves minority Cells)

आसाममध्ये भाजपाला बहुमत मिळाले असले तरी मुस्लिम बहुल भागात भाजपाची कामगिरी निराशाजनक झाली. मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असलेल्या आठ मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात भाजपाला विजय मिळू शकला नाही. त्यामुळे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीने राज्यातील अल्पसंख्याक मोर्चाच्या सर्व शाखा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाने मुस्लिम बहुल भागातील आठ मतदारसंघात भाजपाने आठ उमेदवार दिले होते. मात्र या सर्व उमेदवारांचा दारुण पराभव झाला. भाजपाला अनेक बुथवर २० हून कमी मते मिळाली. ही मते भाजपाच्या बुथ कमिटी मेंबर्सपेक्षाही कमी होती. त्यामुळे अखेरीच प्रदेश कार्यकारिणीने कठोर निर्णय घेतला आहे. 

याबाबत भाजपाचे आसाममधील प्रदेशाध्यक्ष रंजित दास यांनी सांगितले की, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या राज्य, जिल्हा आणि मंडळ स्तरावरील सर्व शाखा तात्काळ प्रभावाने विसर्जित करण्यात येत आहेत. आमच्या पक्षाच्या महिला, युवा, एससी आणि इतर विविध कार्यकारणी आहेत. तसाच अल्पसंख्याक मोर्चाही आहे. आम्ही अल्पसंख्याकांचे प्राबल्य असलेल्या काही मतदारसंघात उमेदवार दिले होते. मात्र या मतदारसंघांमधील अनेक बुथवर आमच्या उमेदवारांना २० मतेही मिळाली नाहीत, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र दरम्यान, भाजपा राज्य अल्पसंख्याक मोर्चाचे प्रमुख मुख्तार हुसेन खान यांनी या निर्णयामागचे नेमके कारण काय आहे माहिती नाही. पक्षाला अनेक ठिकाणी अपेक्षेएवढी मते मिळाली नाहीत, असे सांगितले.  १२६ सदस्य असलेल्या आसाममध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने ७५ जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाजोतला ५० जागा मिळाल्या. उर्वरित एका जागेवर सामाजिक कार्यकर्ते अखिल गोगोई यांनी विजय मिळवला होता.  

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाMuslimमुस्लीमAssamआसामPoliticsराजकारण