शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शुद्ध मराठीतील माफीनामा; मनसेने जान कुमार सानूवरून उद्धव ठाकरेंना डिवचले

By हेमंत बावकर | Updated: October 28, 2020 22:24 IST

Big Boss jan kumar sanu: बिग बॉसच्या १४ व्या हंगामात निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला.

मुंबई: बिग बॉस कार्यक्रमात मराठीचा अपमान करणाऱ्या गायक जान कुमार सानूविरोधात मनसे, शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली होती. मनसेने तर सानूला तुला लवकरच थोबडवणार, अशी थेट धमकी दिली होती. मला मराठी भाषेची चीड येते, असं विधान जान कुमार सानूनं बिग बॉसमध्ये केले. यावर  बिग बॉस कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या 'कलर्स' वाहिनीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणि मनसेला पत्र लिहून माफी मागितली होती. मनसेने इंग्रजी-मराठी पत्रावरून थेट उद्धव ठाकरेंनाच डिवचले आहे. 

तुला लवकरच थोबडवणार; मनसेची जान कुमार सानूला थेट धमकी

'२७ ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या बिग बॉसच्या एपिसोडसंदर्भात काही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्याची दखल घेऊन संबंधित भाग सर्व एपिसोड्समधून काढून घेण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मराठी भाषेसंदर्भातल्या विधानामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही माफी मागतो. आम्ही मराठी प्रेक्षकांचा आदर करतो. भारतातल्या सगळ्याच भाषणांचा आम्ही सन्मान करतो,' असं कलर्सनं मुख्यमंत्र्यांना व राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत आणि राज ठाकरेंना मराठीत हे पत्र पाठविण्यात आले आहे. यावरून आता पुन्हा मराठीचे राजकारण रंगले आहे. 

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मराठीतील पत्र फेसबुकवर पोस्ट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. शुद्ध मराठीतील माफीनामा... बाकीच्यांन सारखे इंग्रजी लेटर घेऊन शांत बसले नाहीत! असा टोला लगावतानाच महाराष्ट्रात मराठीचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, असेही सुनावले आहे. 

बिग बॉसमध्ये नेमके काय झाले?

बिग बॉसच्या १४ व्या हंगामात निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला. मला मराठी भाषेची चीड येते, असं जाननं म्हटलं. यावरून आता मनसेनं आक्रमक भूमिका घेत जानला थेट इशारा दिला आहे. 'जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला,' अशा शब्दांत खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवShiv Senaशिवसेनाbigg boss 14बिग बॉस १४