राजकारणात काहीही होऊ शकतं. काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले हेदेखील उद्या आमच्यासोबत येऊ शकतात, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला. राज्यातील ठाकरे सरकार जावं यासाठीही आमचे प्रयत्न सुरू असल्याचं आठवले म्हणाले. सांगली येथे एका कार्यक्रमानिमित्त रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत नाना पटोले हेदेखील उपस्थित होते. त्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "राज्यातील ठाकरे सरकार लवकर जावं ही आमची इच्छा असून यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे सरकार पाच वर्षही टिकणार नाही हे खरं आहे," असा दावा आठवले यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू नये ही आमची इच्छा आहे. परंतु कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सरकारडून प्रयत्न होणं आवश्यक आहे. परंतु कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास राष्ट्रपती राजवटीबाबत विचार करावा लागणार असल्याचंही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं. आता नो कोरोना नोयापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी गो कोरोना गो चा नारा दिला होता. परंतु आता त्यांनी नो कोरोना नो असा नवा नारा दिला आहे. "देशातीस दहा जिल्ह्यांमधील परिस्थिती गंभीर असून त्यातील आठ जिल्हे हे महाराष्ट्रातच आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं लक्ष देणं आवश्यत आहे. यापूर्वी मी गो कोरोना गो चा नारा दिला होता. परंतु आता जगातून कोरोना जावा यासाठी नो कोरोना नो असा नारा देत आहे," असंही आठवले म्हणाले.
राजकारणात काहीही होऊ शकतं, नाना पटोले आमच्याकडेही येऊ शकतात : रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 21:30 IST
Ramdas Athawale : राज्यातील सरकार पाच वर्ष टिकणार नाही, ते जावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आठवले यांचं वक्तव्य
राजकारणात काहीही होऊ शकतं, नाना पटोले आमच्याकडेही येऊ शकतात : रामदास आठवले
ठळक मुद्देराज्यातील सरकार पाच वर्ष टिकणार नाही, ते जावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आठवले यांचं वक्तव्यगो कोरोना गो नंतर आठवले यांचा नो कोरोना नो हा नारा