महाविकास आघाडीवर बोलाल तर जशाच तसे उत्तर :हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 19:50 IST2021-04-05T19:49:18+5:302021-04-05T19:50:47+5:30
Politics Kolhapur-ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आजारपणावर टीका केल्याबद्दल जिंदल यांनी माफी मागावी, अशी मागणी केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना एवढा राग का आला? राष्ट्रवादी कॉंग्रेससह महाविकास आघाडीवर चुकीची टीका करणाऱ्यांना जशाच तसे उत्तर देऊ, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

महाविकास आघाडीवर बोलाल तर जशाच तसे उत्तर :हसन मुश्रीफ
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आजारपणावर टीका केल्याबद्दल जिंदल यांनी माफी मागावी, अशी मागणी केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना एवढा राग का आला? राष्ट्रवादी कॉंग्रेससह महाविकास आघाडीवर चुकीची टीका करणाऱ्यांना जशाच तसे उत्तर देऊ, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, भाजपचे नवीनकुमार जिंदल यांनी केलेल्या टीकेबद्दल चंद्रकांत पाटील हे दिलगिरी व्यक्त करतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी मतविभागणी करून हसन मुश्रीफ निवडून येत असल्याची टीका केली. हाडाचे काडे आणि रक्ताचे पाणी करून मतदारसंघ तयार करावा लागतो, जीवाचे रान करून कार्यकर्ते सांभाळावे लागतात, याचे भान चंद्रकांत पाटील यांनी ठेवावे.
कागलमधून सहा पैकी पाच निवडणुकीत विजयी मिळवला, त्यातील वीस वर्षे मंत्री म्हणून काम करत आहे. त्यामुळे पाटील यांनी मला शिकवण्यापेक्षा आपला मतदारसंघ तयार करावा. उद्या कदाचित देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री झाल्यानंतर तेथूनही ते निवडणूक लढवतील, असा टोलाही त्यांनी लगावला.