पंजाब, राजस्थाननंतर आता अजून एका राज्यात काँग्रेसमध्ये कलह, दोन बड्या नेत्यांमधील वादाने हायकमांडचे टेंन्शन वाढवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 02:09 PM2021-07-05T14:09:49+5:302021-07-05T14:17:35+5:30

Congress Politics News: राजस्थान, पंजाबसारख्या राज्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादांनी पक्षश्रेष्ठींची चिंता वाढवली आहे. त्यात आता अजून एका राज्यात अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.

In another state after Punjab and Rajasthan, the quarrel in the Congressquarrels between Siddharmaiah and Sivakumar increased the trouble of Congress | पंजाब, राजस्थाननंतर आता अजून एका राज्यात काँग्रेसमध्ये कलह, दोन बड्या नेत्यांमधील वादाने हायकमांडचे टेंन्शन वाढवले 

पंजाब, राजस्थाननंतर आता अजून एका राज्यात काँग्रेसमध्ये कलह, दोन बड्या नेत्यांमधील वादाने हायकमांडचे टेंन्शन वाढवले 

Next

बंगळुरू - केंद्राबरोबरच विविध राज्यांमधील सत्तेच्या बाहेर असलेल्या काँग्रेसमध्ये (Congress ) अनेक ठिकाणी कलह वाढत चालला आहे. एकीकडे काही ज्येष्ठ नेत्यांनी गांधी कुटुंबीयांविरोधात आघाडी उघडली आहे. तर दुसरीकडे राजस्थान, पंजाबसारख्या राज्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादांनी पक्षश्रेष्ठींची चिंता वाढवली आहे. त्यात आता अजून एका राज्यात अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. दक्षिणेतील कर्नाटकमध्ये पक्षाचे दोन नेते आमने-सामने आले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या (Siddharmaiah ) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार ( D.K. Sivakumar) यांच्यात वाद उफाळला आहे. (In another state after Punjab and Rajasthan, the quarrel in the Congress quarrels between Siddharmaiah and D.K. Sivakumar increased the trouble of Congress)

कर्नाटकमध्ये २०२३ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून सिद्धारामय्या आणि शिवकुमार यांच्या चढाओढ सुरू झाली आहे. शनिवारी सिद्धारामय्या यांनी भाजपामध्ये गेलेल्या आणि परत काँग्रेसमध्ये येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. तर काही दिवसांपूर्वी शिवकुमार यांनी अशा नेत्यांच्या पक्षातील पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.

माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी प्रसारमाध्यमांशी  बोलताना सांगितले की, भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मी याबाबत प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्याशी बोलणार आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे. मी आधीच विधानसभेत सांगितले होते की, काँग्रेस सोडणाऱ्या १४ नेत्यांना पक्षात पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही.

त्यापूर्वी डी.के. शिवकुमार म्हणाले की, फसवणे आणि राजकीय पक्ष बदलणे ही राजकारणातील सामान्य बाब आहे. केवळ डी.के.शिवकुमारच नाही तर काँग्रेस आणि प्रत्येक पक्षाकडे अशा घटनांची उदाहरणे आहेत. प्रताप गौडा पाटील यांना आम्ही भाजपातून आणले होते. त्यामुळे कुठल्याही अन्य राजकीय पक्षामध्ये जाणे आणि राजकारणात परतणे ही सामान्य बाब आहे. काँग्रेस सदस्यत्व मिळवण्यासाठी येणाऱ्या कुठल्याही अर्जावर पक्ष विचार करेल आणि पक्षाचे हित लक्षात घेऊन विचार करेल.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धारामय्या यांवनी गुरुवारी आमदारांना सांगितले की, त्यांना २०२३ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून सादर करू नका. या मुद्द्यावरून पक्षामध्ये अंतर्गत मतभेद वाढत आहेत. त्यावरून सिद्धारामय्या आणि डी.के.शिवकुमार यांच्यात एकतर्फी खेळ सुरू आहे.

गतवर्षी शिवकुमार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनल्यावर आमदारांचे वेगवेगळे गट बनले आहेत. यादरम्यान, शिवकुमार यांनी गेल्या महिन्यात सांगितले की, मला मुख्यमंत्री बनण्याची कुठलीही घाई नाही आङे. तसेच माझे लक्ष हे काँग्रेसला पुन्हा एकदा सत्तेत आणण्याचे आहे. 
 

Web Title: In another state after Punjab and Rajasthan, the quarrel in the Congressquarrels between Siddharmaiah and Sivakumar increased the trouble of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.