शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुख यांना ईडीचा आणखी एक धक्का, अजून एका निकटवर्तीयाला घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 12:32 IST

Anil Deshmukh News: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती ईडीने आवळलेला पाश आता आणखी घट्ट होताना दिसत आहे.

नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती ईडीने आवळलेला पाश आता आणखी घट्ट होताना दिसत आहे. अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्यानंतर ईडीने (ED) आज अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी छापे टाकले. एवढेच नाही तर ईडीने अनिल देशमुख यांचे काम पाहणारे त्यांचे दिवाणजी पंकज देशमुख यांनाही ताब्यात घेत देशमुख यांना आणखी एक धक्का दिला आहे. (Another blow of ED to Anil Deshmukh, another close person was taken into custody)

शुक्रवारी अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. त्यानंतर आज सकाळी ईडीची दोन पथके अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथील निवास्थानांवर दाखल झाली. . वडविहिरा हे देशमुख यांचे मूळ गाव आहे. तिथे त्याची वडीलोपार्जित शेती आहे. दरम्यान, येथे छापे टाकल्यानंतर अधिक तपासासाठी ईडीच्या पथकाने देशमुख यांचे दिवाणजी पंकज देशमुख यांना ताब्यात घेतले. दरम्यान, ईडीच्या या कारवाईनंतर अनिल देशमुख यांचे समर्थक संतप्त झाले असून, सुडबुद्धीने ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली होती. त्यामुळे देशमुखांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती.. या जप्त केलेल्या मालमत्तेत मुंबईतील वरळी येथील १ कोटी ५४ लाखांचा निवासी फ्लॅट, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुतूम गावातील २५ प्लॉट्सचा समावेश आहे.

ईडीने जप्त केलेला वरळीमधील फ्लॅट अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावाने रजिस्टर आहे. २००४मध्ये या फ्लॅटची पूर्ण रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली होती. मात्र, तरीदेखील त्याचे विक्रीखत थेट फेब्रुवारी २०२०मध्ये करण्यात आले. देशमुख यावेळी राज्याचे गृहमंत्री होते तसेच देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ५० टक्के मालकी अवघ्या १७.९५ लाख रुपयांना खरेदी केली. मात्र, त्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास ५ कोटी ३४ लाखांच्या घरात असल्याची माहितीही ईडीकडे असल्याचे समजते.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण