शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

...अन् थेट पंतप्रधान मोदींनीच 'मातोश्री'वर फोन लावला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 10:31 AM

राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार हरिवंश सिंह यांना पाठिंबा दिल्याचे निमित्त

मुंबई : शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिला असला, नरेंद्र-देवेंद्र सरकारवर ते रोज टीकेचे बाण सोडत असले, दमलेल्या सावजाची शिकार करण्याची भाषा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली असली, तरी भाजपाकडून आपल्या या जुन्या मित्राची नाराजी दूर करण्याचे, त्यांना गोंजारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पुन्हा समोर आलंय. यावेळी तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच 'मातोश्री'वर फोन करून उद्धव यांचे आभार मानल्याचं कळतं. राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार हरिवंश सिंह यांना पाठिंबा दिल्याबद्दल मोदींनी उद्धव ठाकरेंना धन्यवाद दिलेत.

राज्यसभा उपाध्यक्षपदाची काल, गुरुवारी निवडणूक झाली. यामध्ये भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवाराला 125 मते मिळाली होती. एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेही पाठिंबा दिला होता. राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी हरिवंश सिंह यांच्या उमेदवारीला अनुमोदन दिले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गेल्या महिन्यात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावेळी शिवसेना गैरहजर राहिली होती. शिवसेनेच्या या दोन्ही भुमिका विसंगत असल्याने राजकीय विष्लेशकही बुचकळ्यात पडले आहेत.

केंद्र सरकारमध्ये भाजपचा सर्वांत जुना आणि मोठा सहकारी असूनही पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळात शिवसेनेला दुय्यम स्थान दिल्याचा दावा शिवसेनेने केला होता. यावरून नाराज असलेल्या शिवसेनेने भाजपला वेळोवेळी लक्ष्य केले होते. यातच विधानसभा निवडणुकीवेळी झालेला विश्वासघातही राज्यात शिवसेनेला स्वस्थ बसू देत नाही. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारला वेळोवेळी खिंडीत पकडण्याचा प्रयत्न गेल्या 4 वर्षांपासून सुरु आहेत. असे असले तरीही शिवसेनेला गोंजारण्याचे प्रयत्न भाजच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून होत आहेत. कारण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात देशातील सर्वच घटकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

शिवसेनेसारखा मित्रपक्ष गमावणे भाजपला परवडणारे नाही. यामुळेदोन महिन्यांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी संपर्क   अभियानावेळी मातोश्रीवर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी यापुढील निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली होती. 

या सर्व पार्श्वभूमीवर काल झालेल्या राज्यसभा उपसभापती निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. यानुसार राज्यसभेमध्ये काल शिवसेनेने हरिवंश सिंह यांना पाठिंबा दिला होता. या मदतीचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी मातोश्रीवर फोन केला.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा