शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

“…पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब”; अमृता फडणवीसांचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 18:23 IST

शुक्रवारी मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

ठळक मुद्देअमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहेमुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळे आले, रेल्वे सेवेवरही परिणाम झाला

मुंबई – रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचा वेग मंदावला. रेल्वे सेवेसोबतच रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे अनेकदा पाणी साचण्याचे प्रकार घडत असतात. नेहमी याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं दिसून येते. त्यातच आता मुंबई महापालिकेची निवडणूकही जवळ आल्यानं महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत.

शुक्रवारी मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. अमृता फडणवीस यांनी ट्विट करून म्हटलंय की, ‘इस शहर मै मिल ही जाएंगे, हर मोड पर गड्डे तालाब, पर ढूँढोंगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब’ असं सांगत अमृता फडणवीस यांनी एक फोटो पोस्ट करत शिवसेनेलाअप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

शहरातील प्रत्येक वळणावर पाणी साचलेले खड्डे दिसतील. पण शोधायला गेलं तर एकही गुन्हेगार सापडणार नाही असं म्हणत अमृता फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या ट्विटसोबत अमृता फडणवीस यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोत स्वत: अमृता फडणवीस साचलेल्या पाण्यात उभं राहून प्रशासन अपयशी ठरल्याचं दाखवून देत आहेत.

ट्विटरच्या माध्यामातून साधला होता उद्धव ठाकरेंवर निशाणा

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या विविध मुद्द्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत असतात. काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं होतं. तसेच जनतेलाच 'पहचान कौन?' असं म्हणत एक कोड घातलं होतं.

"ओळखा कोण? एक राजा जो उंबरठा ओलांडत नाही, जनतेला भेट नाही आणि सत्य, कर्माच्या मार्गाने जात नाही. वसुलीशिवाय त्याचं काहीच काम होत नाही. महासाथीचा कहर तो सांभाळू शकत नाही आणि प्रगतीचं फूल ज्याच्या छायेखाली फुलत नाही" अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस