शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अमोल कोल्हे शुटिंगमध्ये व्यस्त, राष्ट्रवादीचे नेते- कार्यकर्ते त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 13:46 IST

तुमचे उमेदवार ऐन निवडणुकीच्या काळात नॉट रिचेबल तुम्हाला विचारेनात. निवडणुकीनंतर मतदारांचे सोडा, कार्यकर्त्यांचे काय होईल? अशी विचारणा व्हायला लागल्यानेही कार्यकर्ते वैतागले आहेत...

ठळक मुद्देफोनही लागेना : प्रचाराची तयारी, पण उमेदवारच नाही

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची धामधूम सुरू असताना शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारअमोल कोल्हे गेल्या चार दिवसांपासून गायब आहेत. मुंबई येथे ते शुटींगसाठी गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे प्रचाराची तयारी केलेले  राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते त्रस्त आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसकडून यंदाच्या वेळी कोल्हे यांना उमेदवारी देऊन खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यापुढे आव्हान उभे करण्यात आले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही दिवस त्यांनी मतदारसंघात अनेक पदयात्रा काढल्या, सभा घेतल्या. परंतु, गेल्या चार दिवसांपासून कोल्हे यांचा प्रचारच बंद झाला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी कोल्हे यांच्या प्रचाराचे नियोजन केले होते.  त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही करत आहेत. मात्र, ते शुटींगमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विस्तार मोठा आहे. जुन्नर तालुक्यापासून ते हडपसरपर्यंत पसरला आहे. मतदारसंघातील प्रमुख गावांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे. उमेदवाराने किमान एकदा तरी आपल्य गावात येऊन जावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, त्यांना  प्रतिसादच मिळत नसल्याने नाराजी आहे. एका बाजुला अमोल कोल्हे नॉट रिचेबल असताना तालुक्यातील कार्यकर्त्यांना नेत्यांकडून मार्गदर्शन मिळत नाही, अशी तक्रार केली जात आहे. बहुतांश नेत्यांनी प्रचारातून अंग काढून घेतले आहे काय अशी परिस्थिती असल्याचे एका कार्यकत्यार्ने लोकमत शी बोलताना सांगितले. आत्तापर्यंत शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत दिलीप वळसे-पाटील यांच्याकडूनच सर्व निर्णय घेतले जायचे. मतदारसंघातील संपूर्ण प्रचारयंत्रणा त्यांच्याकडूनच सक्रिय मंचर या मध्यवर्ती ठिकाणाहून सर्व सूत्रे हलायची. मात्र, यावेळी मंचरहून निरोपच मिळत नसल्याने संभ्रमावस्थेत आहेत. दुसºया बाजुला खासदार शिवाजीराव आढळराव यांचे गावोगावी दौर सुरू आहेत. त्याचबरोबर तालुकावार प्रचाराची यंत्रणाही करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही प्रचार सुरू आहे. मात्र,राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये सर्वच थंडा मामला असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तुमचे उमेदवार ऐन निवडणुकीच्या काळात नॉट रिचेबल तुम्हाला विचारेनात. निवडणुकीनंतर मतदारांचे सोडा, कार्यकर्त्यांचे काय होईल? अशी विचारणा व्हायला लागल्यानेही कार्यकर्ते वैतागले 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv Senaशिवसेना