उत्तर प्रदेशात ननवर हल्ले झाल्याचे आरोप चुकीचे! पीयूष गोयल यांचे विजयन यांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 04:35 IST2021-03-30T04:34:36+5:302021-03-30T04:35:27+5:30
Piyush Goyal's reply to P.Vijayan : केरळमधील दोन ननवर उत्तर प्रदेशात प्रवासादरम्यान हल्ला झाल्याचा आरोप चुकीचा असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशात ननवर हल्ले झाल्याचे आरोप चुकीचे! पीयूष गोयल यांचे विजयन यांना प्रत्युत्तर
कोच्ची : केरळमधील दोन ननवर उत्तर प्रदेशात प्रवासादरम्यान हल्ला झाल्याचा आरोप चुकीचा असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी म्हटले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन या विषयावर चुकीचे वक्तव्य देत असल्याचे ते म्हणाले. (Allegations of attacks on nuns in Uttar Pradesh are false! Piyush Goyal's reply to P.Vijayan)
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर गोयल म्हणाले की, “कुणाही ननवर हल्ला झालेला नाही. केरळचे मुख्यमंत्री बोलत आहेत, ते खरे नाही. ते चुकीचे आरोप करीत आहेत.
विशेष म्हणजे, ही घटना १९ मार्चला घडली होती. मुख्यमंत्री विजयन यांनी हा विषय उचलून धरल्यावर मागील आठवड्यात या विषयावरून केरळमध्ये बराच धुरळा उडाला. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. गोयल म्हणाले की, स्थानिक पोलिसांनी ननच्या विरोधात तक्रार मिळाल्यावर सत्य जाणून घेण्यासाठी चौकशी केली होती. पोलिसांनी योग्य तेच केले. सत्य शोधणे हे पोलिसांचे कामच आहे.