शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

रोहित पवारांचे कट्टर विरोधक राम शिंदेसोबत अजित पवारांचे गुफ्तगू; बंद दाराआड चर्चेमुळे 'उधान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 09:33 IST

Ajit Pawar met Ram Shinde: अंबालिका कारखाना हा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात येतो. अजित पवार नेहमी या कारखान्यावर येत असतात. येथील त्यांचा दौराही गोपनीय असतो. याच मतदारसंघातून रोहित पवार हे राम शिंदे यांना पराभूत करून आमदार झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क सिद्धटेक (अहमदनगर) : आमदार रोहित पवार यांचे राजकीय विरोधक असलेले भाजपचे नेते माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासोबत शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर गोपनीय बैठक झाली. दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. मात्र, तो तपशील बाहेर आलेला नाही. 

अंबालिका कारखाना हा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात येतो. अजित पवार नेहमी या कारखान्यावर येत असतात. येथील त्यांचा दौराही गोपनीय असतो. याच मतदारसंघातून रोहित पवार हे राम शिंदे यांना पराभूत करून आमदार झाले आहेत. शनिवारी सकाळी पवार या कारखान्यावर असताना शिंदे तेथे आले. दोघांची गोपनीय बैठक झाली. काही प्रत्यक्षदर्शींनी या भेटीस दुजोरा दिला. शिंदे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात, असे असताना त्यांनी पवार यांची भेट का घेतली, हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

भाजप सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेची सध्या चौकशी सुरू आहे. हे खाते शिंदे यांच्याकडे असल्याने तो संदर्भ या भेटीला आहे का? शिंदे यांच्याशी चर्चा करून पवार हे नगर जिल्ह्यात काही वेगळे आडाखे बांधू पाहत आहेत का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिंदे धनगर समाजाचे नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न आहे का?, असे विचारले जात आहे. राष्ट्रवादीच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने खासगीत बोलताना ही केवळ सदिच्छा भेट आहे, असे सांगितले. 

भेट झाली ही अफवा ‘लोकमत’ने राम शिंदे यांच्याशी संपर्क केला असता ‘अशी भेट झालीच नाही. सर्व अफवा आहेत. मी कर्जतला नसून पुण्यात आहे’ असे ते म्हणाले. मात्र, त्यांनी तपशीलवार बोलणे टाळले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवारRam Shindeराम शिंदे