शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"कृषी विधेयक शेतकऱ्यांना तर कामगार कायदा कामगारांना देशोधडीला लावेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 23:14 IST

NCP Sunil Tatkare News: सुनील तटकरे यांचे प्रतिपादन । दहिवली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सभा, कर्जतमधील विकासकामांवर भर

कर्जत : ‘केंद्र सरकारने देशात कृषी विधेयक आणले आहे. ते शेतकऱ्यांना तर नवीन कामगार कायदा कामगारांना देशोधडीला लावेल. त्यासाठी आपण सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोना महामारीमध्ये पक्ष संघटनेत मरगळ आली होती. आता आजपासून पक्ष संघटनेकडे लक्ष देण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी येथे केले.

कर्जत दहिवली येथील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा काय असेल? यासाठी कार्यकर्त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, महिला जिल्हा उपाध्यक्ष गीता पारलेचा, रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, कृषी सभापती बबन मनवे, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, शरद लाड, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे अनेक सहकारी आपल्याला सोडून गेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी सुरक्षित कसे राहता येईल हे पाहिले पाहिजे. निवडणुकीनंतर आपण सत्तेत येऊ असे वाटले नव्हते; परंतु शरद पवारांमुळे ते शक्य झाले. कर्जत हा आधी काँग्रेसचा आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. तो आपल्या सर्वांच्या सहकायार्मुळे तसाच राहील. कर्जत तालुक्यातील विकासकामे पूर्वीसारखीच होतील. कर्जत - पनवेल रेल्वे प्रवासी सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जातील,’ असे प्रतिपादन सुनील तटकरे यांनी केले.अदिती तटकरे यांनी, ‘पूर्वीपासूनच या मतदारसंघात श्रीवर्धन मतदारसंघाच्या बरोबरीने नव्हेतर, त्यापेक्षा जास्तच विकासकामे केली आहेत. त्याप्रमाणेच आताही काकणभर जास्तच कामे या मतदारसंघात होतील,’ असे सांगितले.नवीन कार्यकर्त्यांना संधीसुरेश लाड यांनी तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेताना, ‘नेरळमध्ये आता टॉवर उभे राहत आहेत. त्यामुळे तेथील ग्रामसेवकाच्या आवाक्याबाहेर कामाचा व्याप आहे. तेथे नगरपालिका होणे गरजेचे आहे. कोंढाणा धरणही होणे आवश्यक आहे. तेसुद्धा कर्जतकरांसाठी. कारण भविष्यात पाण्यावरील वीजनिर्मिती बंद झाली तर आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागेल. पक्ष संघटना बांधताना येथील पदाधिकाºयांनी आम्हाला आता बाजूला करा. नवीन कार्यकर्त्यांना संधी द्या, असे जरी सांगितले असले तरी या परिस्थितीत सध्या तरी बदल होणार नाही; मात्र सर्वांच्या विचाराने सारे काही व्यवस्थित होईल,’ असे सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसsunil tatkareसुनील तटकरेCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीagricultureशेती