शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

राहुल गांधींनंतर कांग्रेसशी संबंधित अजून एका अकाऊंटवर ट्विटरची कारवाई, दिलं हे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 15:22 IST

Congress & twitter News: ट्विटरने काँग्रेससी संबंधित अजून एका अकाऊंटवर कारवाई केली आहे. ट्विटरने काँग्रेसचा डिजिटल चॅनेल असलेल्या आयएनसी टीव्हीच्या अकाऊंटला तात्पुरत्या स्वरूपात लॉक केले आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केल्याने ट्विटरने नियमभंग झाल्याचा हवाला देत राहुल गांधींचे अकाऊंट तात्पुरते सस्पेंड केले होते. दरम्यान, आता ट्विटरनेकाँग्रेससी संबंधित अजून एका अकाऊंटवर कारवाई केली आहे. ट्विटरने काँग्रेसचा डिजिटल चॅनेल असलेल्या आयएनसी टीव्हीच्या अकाऊंटला तात्पुरत्या स्वरूपात लॉक केले आहे. ट्विटरने सांगितले की, आयएनसी टीव्हीने काही नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे त्यांचे अकाऊंट तात्पुरते लॉक करण्यात आले आहे.

तत्पूर्वी पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट तात्पुरत्या स्वरूपात सस्पेंड करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला होता. त्यानंतर ट्विटरने काँग्रेसचा हा दावा फेटाळून लावला होता. तसेच हे अकाऊंट अद्याप सेवेत असल्याचेही सांगितले होते. त्यानंतर काँग्रेसने राहुल गांधी यांचे अकाऊंट तात्पुरत्या स्वरूपात लॉक करण्यात आले आहे.

दरम्यान, लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी शनिवार नंतर ट्विटरवर कुठलेही ट्विट केलेले नाही. राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट पूर्ववत व्हावे यासाठी सोमवारी युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीमध्ये ट्विटर कार्यालयासमोर आंदोलनही केले. तसेच राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट कुणाच्या सांगण्यावरू चुकीच्या पद्धतीने लॉक करण्यात आले, असा सवाल युवा काँग्रेसने विचारला आहे.

दरम्यान, गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केला होता. त्यावर भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ट्विट हटवलं होतं. पण आता त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं सस्पेंड करण्यात आलं होतं. एका वकिलाने पीडितेच्या कुटुंबाची ओळख जगजाहीर होत असल्यानं फोटोवर आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पीडितेच्या आईवडिलांचा फोटो शेअर केला आहे. यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख पटली आहे. त्यामुळे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार वकील विनीत जिंदल यांनी केली होती. 

ट्विटरकडून आता राहुल गांधी यांचं थेट ट्विटर अकाऊंटच सस्पेंड करण्यात आल्यानंतर राहुल गांधी यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान, काही वेळानंतर राहुल गांधींच ट्विटर अकाऊंट पूर्ववत करण्यात आलं. पण ते नेमकं सस्पेंड का करण्यात आलं होतं याची चर्चा आता सुरू झाली आहे. काँग्रेसकडून ट्विटरला उत्तर पाठविण्यात आल्यानंतर राहुल गांधींचं ट्विटर अकाऊंट पूर्ववत करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीTwitterट्विटर