शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

शिवसेनेत आणखी एक लेटरबॉम्ब; सरनाईकांनंतर आता विजय शिवतारेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 16:50 IST

प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर आता विजय शिवतारे यांनीही हॉस्पिटलमधूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे

ठळक मुद्देया पत्रात शिवतारेंनी पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावर निशाणा साधला आहेगुंजवणी धरणाला १९९३ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये हे धरण पूर्ण झाले.गुंजवणीतून जलवाहिनीद्वारे पाणी पुरंदर, भोर आणि वेल्हे तालुक्याला पुरवठा करण्याची योजना आखली होती.

मुंबई – अलीकडेच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक(Shivsena Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) पत्र लिहिलं होतं. या पत्रानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. या पत्रातून महाविकास आघाडीतल्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेना कमकुवत करण्याचं काम केलं जात आहे. असा आरोप केला होता. त्यामुळे शिवसेनेने भाजपाशी जुळवून घ्यावं अशी मागणी सरनाईकांनी केली होती.

प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर आता विजय शिवतारे यांनीही हॉस्पिटलमधूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रात शिवतारेंनी पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. या पत्रात विजय शिवतारे म्हणतात की, गुंजवणी धरण मी राज्यमंत्री असताना मोठ्या मेहनतीतून पुरंदर, भोर आणि वेल्हे या तीन तालुक्यांना वरदान ठरेल यासाठी पूर्ण केले होतं. या धरणाला १९९३ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये हे धरण पूर्ण झाले. गुंजवणीतून जलवाहिनीद्वारे पाणी पुरंदर, भोर आणि वेल्हे तालुक्याला पुरवठा करण्याची योजना आखली होती. त्यासाठी १३१३ कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. वेल्हे आणि भोरचं काम पूर्ण झालं. परंतु पुरंदर तालुक्यात काही दिवसांपूर्वी या योजनेचे काम बंद करण्यात आले आहे असं त्यांनी सांगितले.

याठिकाणचे स्थानिक आमदार संजय जगताप यांनी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. इतकचं नाही तर अधिकाऱ्यांना धमक्या देऊन गुंजवणीचं पाणी पुरवठा काम बंद केले आहे. या कामाचं भूमिपूजन स्वत:च्या हस्ते व्हावं यासाठी आमदारांचा आग्रह आहे. ही योजना लवकर पूर्ण करण्याच्या हेतून जलसंपदा विभागाशी समन्वय साधत मी पुरंदर तालुक्यातही जलवाहिनीच्या कामास सुरुवात केली. जलवाहिनीद्वारे १०० टक्के सूक्ष्म सिंचन करणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. यासाठी १३१३ कोटींची मंजुरी मिळवण्यात मला यश आलं. मात्र हरित लवाद, जलसंपत्ती अधिनियम प्राधिकरण, उच्च न्यायालय, केंद्रीय पर्यावरण विभाग यांच्याकडे सातत्याने याचिका करून हे काम होऊ नये यासाठी मला त्रास देण्यात आला. ज्यांनी या प्रकल्पाचं काम बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले त्यांच्याच हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ व्हावा याच्या इतकी शोकांतिका असून शकत नाही असं विजय शिवतारे यांनी पत्रात म्हटलं आहे. याशिवाय या कामाचा शुभारंभ आपल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व्हावा, तो ऑनलाईन झाला तरी चालेल अशी इच्छा विजय शिवतारेंनी पत्रात व्यक्त केली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेpratap sarnaikप्रताप सरनाईकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस