शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

आता प्रियंका करणार अयोध्यावारी; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाला घेरण्याची तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 10:34 IST

नौका यात्रेनंतर आता प्रियंका गांधी करणार ट्रेन यात्रा

लखनऊ: काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी नौका यात्रेनंतर आता रेल्वेनं लोकांशी संपर्क साधणार आहेत. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी असलेल्या प्रियंका गांधी 27 मार्चला दिल्ली ते फैजाबाद दरम्यान रेल्वे यात्रा करणार आहेत. ही यात्रा करताना त्या त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधतील. याआधी प्रियंका गांधींनी प्रयागराज ते वाराणसी दरम्यान नौका यात्रा करत मतदारांशी संवाद साधला होता. प्रियंका गांधींनी सॉफ्ट हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी त्यांच्या प्रचार अभियानाची सुरुवात प्रयागराजमधील हनुमान मंदिरात पूजा करुन केली. त्यानंतर त्यांनी गंगा नदीचीदेखील पूजा केली. विंध्याचल मंदिरात जाऊन त्यांनी विंध्यवासिनी देवीचं दर्शनदेखील घेतलं. यानंतर त्यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला भेट देत दशाश्वमेध घाटाचा दौरा केला. आता प्रियंका अयोध्येला जाणार आहेत. प्रियंका गांधींचे वाढते दौरे भाजपासाठी अडचणीचे ठरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे प्रियंका गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करत आहेत. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी अयोध्येत रोड शो करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या कोणकोणत्या पवित्र स्थळांना भेटी देणार याबद्दलची माहिती अद्याप काँग्रेसकडून देण्यात आलेली नाही. 'प्रियंका गांधी दिल्लीहून कैफियत एक्स्प्रेसनं फैजाबादला येतील. त्यांची ट्रेन पहाटे साडेपाचच्या सुमारास फैजाबाद पोहोचेल,' अशी माहिती उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव राजेंद्र प्रताप सिंह यांनी दिली. फैजाबाद रेल्वे स्थानकाजवळील हॉटेलमध्ये थोडा वेळ थांबल्यानंतर त्या सकाळी 10 च्या सुमारास अयोध्येत रोड शो करतील. हा रोड शो 50 किलोमीटरचा असेल. कुमारगंजमध्ये रोश शोची समाप्ती होईल, असं सिंह यांनी सांगितलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरyogi adityanathयोगी आदित्यनाथ