शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

राजे की भावोजी ; कोण मारणार बाजी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 21:04 IST

सध्या महाराष्ट्रात राजकीय यात्रांचा काळ सुरु झाला असून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासमोर शिवसेनेने आदेश बांदेकर यांच्या रूपाने थेट आव्हान उभे केले आहे. त्यामुळे ''राजे की भावोजी ; कोण मारणार बाजी' असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

पुणे : सध्या महाराष्ट्रात राजकीय यात्रांचा काळ सुरु झाला असून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासमोर शिवसेनेने आदेश बांदेकर यांच्या रूपाने थेट आव्हान उभे केले आहे. त्यामुळे ''राजे की भावोजी ; कोण मारणार बाजी' असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

 मुळात कोल्हे हेदेखील यापूर्वी शिवसेनेत होते. त्यामुळे हा लढा आजी विरोधात माजी शिवसैनिक असाही असणार आहे. दुसरे साम्य म्हणजे हे दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत असून दोघांनीही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज अशा ऐतिहासिक भूमिकांमधून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे, तर बांदेकर गेली अनेक वर्ष काम एका कार्यक्रमात सूत्रधाराची भूमिका निभावत मनामनात पोचले आहेत. त्यामुळे दोघेही आपले राजकीय आणि स्वतःच्या प्रतिमेचे कसब पणाला लावून मैदानात उतरतील यात शंका नाही. 

    राजकीय युद्ध तापायला सुरुवात झाली असताना कोणताही राजकीय पक्ष कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून कोल्हे किल्ले शिवनेरीपासून राज्यभर शिवस्वराज्य यात्रेद्वारे संवाद साधणार आहेत. दुसरीकडे शिवसेनेने जनआशीर्वाद यात्रेचे नियोजन केले आहे. मात्र त्यातही बांदेकर यांची महिला वर्गामध्ये असणारी लोकप्रियता लक्षात घेत त्यांचा 'माऊली संवाद' हा खास उपक्रम आयोजित केला जाणार आहे. यामुळे सोशल मीडियाचा वापर न करणाऱ्या ग्रामीण भागातील महिलाही यातून शिवसेनेकडे आकर्षित होऊ शकतात. कोल्हे यांची क्रेझ तरुणांमध्ये आहेच पण त्यांनाही आता महिला वर्गाच्या मतांवर फोकस करावा लागेल. अर्थात दोघांकरिता हे आव्हानच असून त्यांना प्रत्यक्ष मतपेटीतून कसा प्रतिसाद मिळतो हे बघावे लागणार आहे. पण सध्या तरी मूळ अभिनेते असलेले हे नेते एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत असे चित्र आहे. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेAdesh Bandekarआदेश बांदेकरShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस