मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार; फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 08:45 PM2020-10-02T20:45:40+5:302020-10-02T20:46:36+5:30

CM Uddhav Thackeray, AAP News: उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यातून राज्यातील प्रामुख्याने ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार असल्याचे वचन दिले होते.

AAP lodges complaint against CM Uddhav Thackeray at police station about fraud case | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार; फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार; फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी

Next

अमरावती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी राज्यातील वीज ग्राहकांना ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या  ग्राहकांसाठी घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार, असे वचन दिले होते. त्याउलट आपत्तीच्याही परिस्थितीत वीजदर वाढवून जनतेची फसवणूक व विश्वासघात केला. त्यांच्यावर फसवणूक व अप्रामाणिकपणाचा गुन्हा नोंदवा, अशी तक्रार आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शहर हद्दीतील सात विविध पोलीस ठाण्यांत नोंदविली. 

मुख्यमंत्र्यावर भारतीय दंड संहिता कलम ४१५ (फसवणूक) आणि ४२० (अप्रामाणिकपणा बेईमानी) तसेच लोकप्रतिनिधी कायदा कलम १२३ (ब) भ्रष्ट व्यवहाराप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आपचे महानगर संयोजक संजय पांडव, जिल्हा सचिव रोशन अर्डक, सहसंयोजक प्रमोद कुचे, किशोर वानखडे, रंजना मामर्डे, प्रवीण काकड, वसंत पाटील, महेश देशमुख, अतुल वानखडे, सुरेश साहू, आशिष देशमुख, पंकज कुऱ्हेकर, संतोष रंगे यांनी   नोंदविली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यातून राज्यातील प्रामुख्याने ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार असल्याचे वचन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून जनतेने शिवसेनेच्या ५६ उमेदवारांना निवडून दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झालेत. मात्र, त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. त्यांच्या वचनाची प्रतही तक्रारकर्त्यांनी तक्रारीला जोडली होती.

चांदूर रेल्वेत मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार
शिवसेनेच्या वचननाम्यातील वीजेच्या मुद्यावर आम आदमी पक्ष आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करून ‘आप’च्यावतीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तक्रार देतेवेळी आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटन मंत्री  नितीन गवळी, गौतम जवंजाळ, विनोद लहाने, चरण जोल्हे, नीलेश कापसे, गोपाल मुरायते, हरिभाऊ जुनघरे, सागर गावंडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: AAP lodges complaint against CM Uddhav Thackeray at police station about fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.