शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपा फक्त दोन गुजरात्यांचा पक्ष झालाय, एक रंगा, तर दुसरा बिल्ला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 17:29 IST

आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला

नवी दिल्लीः आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना उमेदवारी न दिल्यानं नाराजी व्यक्त केली आहे, ते म्हणाले, भाजपा आता फक्त दोन गुजरात्यांचा पक्ष झालाय, एक रंगा आणि दुसरा बिल्ला यांचा पक्ष बनून राहिलाय. भाजपानं लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांचं तिकीट कापलं आहे. त्यानंतर आता मोदी आणि शहांविरोधात इतर राजकीय पक्षांचे नेते तीव्र नाराजी व्यक्त करू लागले आहेत.संजय सिंह ट्विट करत म्हणाले, अडवाणीजी, जोशीजी, सुमित्रा ताई, कलराज मिश्रा यांचं तिकीट कापलं आहे. सुषमा स्वराज आणि उमा भारतींनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भाजपा फक्त दोन गुजरात्यांचा पक्ष बनून राहिलाय. तो पक्ष एक रंगा आणि दुसरा बिल्ला चालवतोय. गेल्या काही दिवसांपूर्वीही संजय सिंह यांनी मोदींवर टीका केली होती. मोदींनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर सडकून टीका केली होती.' सपाचा 'स' रालोदचा 'रा' आणि बसपाचा 'ब' ही सराब (दारू) सत्यानाश करेल,' अशी टीका मोदींनी केली होती. नेमक्या या विधानावरच संजय सिंह यांनी बोट ठेवलं आहे. ' मोदींची तपासणी करा. ते गांजा तर ओढत नाहीत ना? राजकीय पक्षांना गांजा, दारू, कोकेन अशा उपमा एखादा छोटासा गटनेता, चौकातील नेता देऊ शकतो. पंतप्रधानांना ही भाषा शोभत नाही', असं ते म्हणाले होते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहा