भाजपा ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करतोय, अडवाणी अन् जोशींना तिकीट न दिल्याचं केजरीवालांना दुःख
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 13:36 IST2019-03-26T13:35:48+5:302019-03-26T13:36:58+5:30
लोकसभा निवडणूक 2019ची रंगत चांगलीच चढली आहे.

भाजपा ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करतोय, अडवाणी अन् जोशींना तिकीट न दिल्याचं केजरीवालांना दुःख
नवी दिल्ली- लोकसभा निवडणूक 2019ची रंगत चांगलीच चढली आहे. या निमित्तानं राजकीय पक्षही एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडत नाही. सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची नावं जाहीर करत आहेत. जस जशी उमेदवारांची नावं जाहीर केली जात आहेत, तस तसे राजकीय वातावरण तापत चाललं आहे. भाजपानं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतून अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू दिला आहे. अशाच नेत्यांनी भाजपाच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावं वगळण्यात आली आहेत. आता या मुद्द्यावरून भाजपावर विरोधकांनीही निशाणा साधला आहे.
लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावं उमेदवारांच्या यादीतून वगळल्यानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही दुःख झालं आहे. अरविंद केजरीवाल ट्विट करत म्हणाले, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींना तिकीट नाकारून भाजपानं ज्येष्ठांचा अपमान केला आहे. ते हिंदू संस्कृतीच्या विरोधातही आहे.
जिन्होंने घर बनाया उन्ही बुजर्गो को घर से निकाल दिया? जो अपने बुजर्गो का नही हो सकता वो किसका होगा? क्या यही भारतीय सभ्यता है? हिन्दू संस्क्रति तो ये नही कहती कि बुजर्गों को बेज्जत करो
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 26, 2019
देश के लोगो मे चर्चा है कि मोदी जी आडवाणी जोशी और सुषमा की बेज्जती क्यो कर रहे है? https://t.co/bcU1uZbK69
हिंदू धर्मात आपल्याला ज्येष्ठांचा सन्मान करणं शिकवण्यात आलं आहे. आमचं सरकारनं दिल्लीत सुशासन स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार त्यामध्ये अडचणी आणत आहे. सीसीटीव्हीसाठी आम्ही गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. परंतु केंद्र सरकारनं तसं होऊ देत नाहीये.