वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समिती मावळचे दहा गण अशा एकूण पंधरा जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून (दि. १६) सुरुवात झाली.
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही बुधवारी (दि. २१) असून, आता उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस बाकी आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झालेल्या पहिल्या दिवशी एकूण ७४, दुसऱ्या दिवशी एकूण ४१ आणि तिसऱ्या दिवशी एकूण ४५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. रविवारी (दि.१८) सुटी असल्याने उमेदवारी अर्ज स्वीकारले नाहीत. एकूण १५७ उमेदवारी अर्ज नेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Web Summary : Despite the start of nominations for Zilla Parishad and Panchayat Samiti elections in Maval taluka, no applications were filed in the first three days. While 157 forms were sold, the deadline approaches with only two days remaining.
Web Summary : मावल तालुका में जिला परिषद और पंचायत समिति चुनावों के लिए नामांकन शुरू होने के बावजूद, पहले तीन दिनों में कोई आवेदन दाखिल नहीं किया गया। जबकि 157 फॉर्म बेचे गए, अंतिम तिथि केवल दो दिन शेष रहने के साथ आ रही है।