शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून चिंचवड येथे तरुणाचा निर्घृण खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 12:59 IST

चाफेकर चौकाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी कोयता आणि लोखंडी रॉडने शरीरावर वार करत हा खून करण्यात आला.

ठळक मुद्देउपचार सुरु असताना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मृत्यू

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून चिंचवड येथे तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना चाफेकर चौकात मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आकाश उर्फ रायबा तानाजी लांडगे (वय २४, रा. पागेची तालीम जवळ, चिंचवडगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत ज्ञानोबा वीर (वय ४४, रा. लक्ष्मीगंधा अपार्टमेंट, पागेची तालीम जवळ, चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रणजित बाबू चव्हाण (वय २७, वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड), स्वप्नील ऊर्फ बाबा मोरे (वय २३, रा भोई आळी, चाफेकर  चौकाजवळ, चिंचवडगाव), प्रफुल्ल ढोकणे, सोन्या वराडे या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश आणि रणजित यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून भांडणे सुरु होती. मंगळवारी रात्री आकाश दुचाकीवरून जात होता. चाफेकर चौकाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्याला अडविले. कोयता आणि लोखंडी रॉडने आकाशच्या पायावर आणि कमरेच्या खाली मागील बाजूला वार केले. तसेच सिमेंटची कुंडी आकाशच्या डोक्यात मारली. यामध्ये आकाश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मृत्यू झाला. आरोपी रणजित चव्हाण याच्यावर यापुर्वी ८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली आहे. बाबा मोरे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. मृत्यू झालेल्या आकाश याच्यावरही यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. घटनेचा पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसMurderखून