शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गेम वाजवायची म्हणून पिस्तूल खरेदीसाठी फोडले एटीएम; पिंपरीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 22:07 IST

चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी : आपल्याला मारहाण करणाऱ्या तरुणाचा गेम वाजवण्यासाठी पिस्तूल खरेदी करायचे म्हणून एका तरुणाने चक्क एटीएम फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा दरोडा विरोधी पथकाने आरोपी तरुणाला अटक केली. 

विशाल दत्तू कांबळे (वय २४, रा. संगमनगर, रेल्वे लेन, जुनी सांगवी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १६) रात्री एकच्या सुमारास एका चोरट्याने जुनी सांगवी येथील ॲक्सीस बँकेचे एटीएमची तोडफोड करून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर दरोडा विरोधी पथकाने परिसरातील ८० ते ९० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. एटीएममधील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीने घातलेला शर्ट आणि सॅंडलवरून पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी संगमनगर, जुनी सांगवी या परिसरातील असावा, अशी माहिती मिळाली. पोलीस नाईक राजेश कौशल्ये यांना सोमवारी रात्री साडेआठला संशयित तरुण निदर्शनास आला. त्याच्या नकळत पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. एका हॉटेल जवळ तो थांबला असता त्यास पोलीस नाईक कौशल्ये यांनी दारू कोठे मिळेल, असे विचारले. त्याने जवळच्या परिसरात दारू मिळेल, असे सांगितले. तेव्हा त्यास दारू पिण्यास सोबत जाऊ, असे म्हणून विश्वासात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. मागील आठवड्यामध्ये सांगवी परिसरामध्ये ऐकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून त्याला एका मुलाने मारहाण केली होती. त्याचा राग त्याच्या मनामध्ये होता. त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने मारहाण केलेल्या मुलाचा गेम वाजविण्यासाठी पिस्तुलची आवश्यकता होती. पिस्तुल आणण्यासाठी एटीएम फोडून पैसे मिळतील व त्या पैशातून पिस्तुल खरेदी करून मारहाण करणाऱ्या मुलाला काही अंतरावरून गोळी मारायची होती, असा त्याने प्लॅन केला होता. म्हणून त्याने एटीएम फोडले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. 

सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस कर्मचारी राजेश कौशल्ये, उमेश पुलगम, सागर शेडगे, राजेंद्र शिंदे, विक्रांत गायकवाड, प्रवीण कांबळे, प्रवीण माने, आशिष बनकर, नितीन लोखंडे, गणेश कोकणे, चिंतामण सुपे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस