काळेवाडीत तरुणाची गळफास घेत राहत्या घरी आत्महत्या;कारण अद्याप अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 22:13 IST2021-06-16T22:13:28+5:302021-06-16T22:13:39+5:30
मेघनाथला त्वरित महापालिकेच्या पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले

काळेवाडीत तरुणाची गळफास घेत राहत्या घरी आत्महत्या;कारण अद्याप अस्पष्ट
पिंपरी : राहत्या घरात छताच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. काळेवाडी येथे बुधवारी (दि. १६) हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
मेघनाथ गोरख पोटफोडे (वय २०, रा. आदर्शनगर, काळेवाडी), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार: मेघनाथ याने राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मेघनाथ याला त्वरित महापालिकेच्या पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मेघनाथ याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वाकड पोलीस तपास करीत आहेत.