गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:01 IST2017-08-01T04:01:47+5:302017-08-01T04:01:47+5:30
चंदननगर येथील एका लॉजमध्ये तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
विमाननगर : चंदननगर येथील एका लॉजमध्ये तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. येरवडा येथील गणेश हिरा राठोड (वय ३३) असे आत्महत्या करणाºया युवकाचे नाव असून, चंदननगर पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शनिवारी रात्री एकटाच चंदननगर येथील सागर लॉजमध्ये आला होता. रविवारी उशिरापर्यंत तो थांबलेल्या खोलीतून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लॉजच्या मॅनेजरने चंदननगर पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी त्या बंद खोलीचा दरवाजा तोडला. गणेशने खोलीतील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. पोलिसांना एका बॅगेत काही कपडे, खिशातील पाकिटात चारशे रुपये, लायसन्स व इतर काही कागदपत्रे मिळाली. त्यावरून पोलिसांनी गणेशच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठवला.
गणेश हा येथील एका खासगी कंपनीत १० वर्षांपासून काम करीत होता. सध्या तो सिनीयर मॅनेजर म्हणून काम करीत होता. तसेच त्याचा फ्लेक्स प्रिंटीगचाही व्यवसाय होता. ३ वर्षापूर्वी लग्न झाले होते.