किवळेत पवना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

By नारायण बडगुजर | Updated: April 25, 2024 22:13 IST2024-04-25T22:13:02+5:302024-04-25T22:13:23+5:30

किवळे गाव येथील महादेव घाट येथे ही घटना घडली.

young man died after drowning in the river pavana in kiwale | किवळेत पवना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

किवळेत पवना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला तरुण पवना नदीपात्रात बुधवारी (दि. २४) सायंकाळी पाचच्या सुमारास बुडाला. त्याचा मृतदेह गुरुवारी (दि. २५) सकाळी नऊच्या सुमारास मिळून आला.किवळे गाव येथील महादेव घाट येथे ही घटना घडली.

तुषार नरेश जाधव (१७, रा. विठ्ठलनगर, लांडेवाडी, भोसरी), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार हा त्याच्या काही मित्रांसोबत किवळे गाव येथील महादेव घाटावर गेला. त्यावेळी पवना नदीपात्रात पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. याबाबत माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान तसेच रावेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

तुषार याचा नदीपात्रात शोध सुरू केला. मात्र, अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू केले. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जीव रक्षक व मावळ रेस्क्यू टीमने शोध घेतला. त्यावेळी सकाळी नऊच्या सुमारास तुषारचा मृतदेह मिळून आला. महापालिकेच्या पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

Web Title: young man died after drowning in the river pavana in kiwale