अभियंता तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आई-वडिलांना बसला जबर धक्का

By नारायण बडगुजर | Updated: July 6, 2025 20:58 IST2025-07-06T20:58:38+5:302025-07-06T20:58:58+5:30

पिंपरी : अभियंता तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. चिंचवड वाल्हेकरवाडीतील गुरुव्दारा चौक परिसरात रविवारी (दि. ६ जुलै) सकाळी नऊच्या ...

Young engineer commits suicide by hanging in Pimpri | अभियंता तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आई-वडिलांना बसला जबर धक्का

अभियंता तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आई-वडिलांना बसला जबर धक्का

पिंपरी : अभियंता तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. चिंचवड वाल्हेकरवाडीतील गुरुव्दारा चौक परिसरात रविवारी (दि. ६ जुलै) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

कुंदन संजय बडगुजर (वय २२, मूळ रा. अर्थे, ता. शिरपूर, जि. धुळे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुंदन नोकरीच्या शोधात पिंपरी-चिंचवड शहरात आला होता. बहीण दीपाली आणि तिचा पती जयेश काशिनाथ बडगुजर (सध्या रा. गुरुव्दारा चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड, मूळगाव चोपडा, जि. जळगाव) यांच्याकडे तो काही दिवसांपूर्वी आला होता. एका खासगी कंपनी इंटर्नशिप करत होता. त्याची बहीण दीपाली आणि दाजी जयेश हे त्यांच्या मूळगावी गेले होते. दरम्यान, कुंदन याच्याशी फोनवरून त्यांनी संपर्क साधला असता तो काॅल रिसिव्ह करत नव्हता. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली. शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा वाजवला मात्र, त्यानंतरही घरातून कुंदन याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर काही नातेवाईकांनी येऊन दरवाजा तोडला असता, घरात कुंदन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. याबाबत माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

कुंदन याला पिंपरी येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. शवविच्देछन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. कुंदन याचा मृतदेह मूळगावी अर्थे (ता. शिरपूर) येथे नेण्यात आला. तेथे सोमवारी (दि. ७ जुलै) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आईवडिलांना बसला धक्का...

कुंदन याचे वडील संजय शेतकरी आहेत. आई सरला गृहिणी असून शेतीकामही करते. त्यांना कुंदन आणि दीपाली ही अपत्ये आहेत. काही दिवसांपूर्वीच दीपाली हिला मुलगा झाला होता. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. कुंदन याला नोकरी लागून सुखाचे दिवस येऊन आपले स्वप्न पूर्ण होईल, असे आई वडिलांना वाटत होते. मात्र, कुंदन याच्या मृत्यूने स्वप्न अपूर्णच राहिले. दरम्यान, कुंदन याच्या मृत्यूच्या घटनेची माहिती अर्थे गावात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेमुळे त्याच्या आईवडिलांना आणि बहिणीला मोठा धक्का बसला.

Web Title: Young engineer commits suicide by hanging in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.