एमआयडीसीतील कामगारांत नाराजी
By Admin | Updated: February 22, 2017 02:57 IST2017-02-22T02:57:25+5:302017-02-22T02:57:25+5:30
एकीकडे मतदानासाठी इतर कर्मचाऱ्यांना सुटी मिळत असताना दुसरीकडे पिंपरी-चिंचवडसह

एमआयडीसीतील कामगारांत नाराजी
पिंपरी : एकीकडे मतदानासाठी इतर कर्मचाऱ्यांना सुटी मिळत असताना दुसरीकडे पिंपरी-चिंचवडसह परिसरातील अनेक खासगी कंपन्यांनी मतदानासाठी कामगारांना सुटी न दिल्याने कामगारांमध्ये नाराजी होती.
पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरात अनेक कंपन्या असून यामध्ये हजारो कामगार काम करतात. दरम्यान, मंगळवारी झालेल्या महापालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात आली होती. यामुळे मतदानवाढीसाठी देखील फायदा होतो. मात्र, खासगी कंपन्यांतील मागणी असतानाही या कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात आली नव्हती. मतदान प्रक्रियेसाठी केवळ दोन तासांची सवलत देण्यात आली होती. यामुळे दूर अंतरावर नोकरीला असलेल्या कामगारांना मतदान करण्यासाठी जाणेही शक्य झाले नाही. (प्रतिनिधी)