कामगाराला खायला लावली विष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 07:08 IST2019-03-15T07:08:32+5:302019-03-15T07:08:53+5:30

हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

The worker feeds the feces | कामगाराला खायला लावली विष्ठा

कामगाराला खायला लावली विष्ठा

पिंपरी : वीटभट्टीवर काम करणारा कामगार व मालक यांच्यात कामावरुन शाब्दिक वादावादी झाली. यामध्ये मालकाला राग अनावर झाल्याने त्याने कामगाराला चक्क विष्ठा खाण्यास भाग पाडले. मानव जातीला काळिमा फासणारी ही घटना मुळशी तालुक्यातील जांबे येथे घडली. याप्रकरणी संदीप पवार नामक व्यक्तीवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कामगाराने फिर्याद दिली आहे.

मिळालेली माहिती अशी, फिर्यादी कामगार व त्याचे कुटुंबीय पवार याच्या वीटभाट्टीवर कामाला असून तेथेच रहायला आहे. बुधवारी दुपारी फिर्यादीचे कुटुंबीय वितभट्टीजवळ असताना 'कामाला सुरुवात कर', असे पवार कामगाराला म्हणाला, त्यावेळी कामगार म्हणाला 'आताच जेवण केलंय थोडा वेळातच कामाला सुरुवात करतो'. दरम्यान कामगार असे म्हटल्याने मालकाला राग अनावर झाला. यावरून मालकाने त्याला शिव्या दिल्या. त्यानंतर कामगारनेही मालकाला शिव्या दिल्या. यामुळे संतापलेल्या पवार याने कामगाराला त्याच्या आईचा उल्लेख अश्लीलरित्या करत विष्ठा खाण्यास सांगितले. मात्र, यावर कामगाराने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे मालकाने त्याला मारहाण केली. यामुळे घाबरलेल्या कामगाराने विष्ठा खाल्ली.

Web Title: The worker feeds the feces