पिंपरी : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भोसरीतील शास्त्री चौकात घडला.मयूर लक्ष्मण जाधव, महेश लक्ष्मण जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भोसरीतील आळंदीरोड येथे राहणाऱ्या महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी महिला शास्त्री चौकातील दत्त मंदिराजवळील दुकानातून घरी जात असताना मयूर जाधवच्या आईने मयूरबाबत फिर्यादी महिलेकडे विचारणा केली. त्याचवेळी मयूर जाधवने महिलेच्या तोंडावर चापट मारली. तसेच शिवीगाळ केली. दरम्यान, मयूरचा मोठा भाऊ महेश जाधव यानेही महिलेला शिवीगाळ केली. तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास तुमच्याकडे पाहुन घेतो अशी धमकी दिली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
भोसरीत महिलेचा विनयभंग, दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 20:58 IST