जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 02:06 IST2018-12-13T02:05:49+5:302018-12-13T02:06:35+5:30

मारहाण, शिवीगाळ करीत कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत आरोपीने महिलेवर बलात्कार केला. तिचे अश्लील चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून आरोपीने वारंवार महिलेवर अत्याचार केला.

Woman raped by threatening to death | जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

पिंपरी : मारहाण, शिवीगाळ करीत कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत आरोपीने महिलेवर बलात्कार केला. तिचे अश्लील चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून आरोपीने वारंवार महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. साईनाथ शेट्टी (वय ४४, रा. थेरगाव) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साईनाथ शेट्टी हा थेरगाव येथील राहणारा आहे. परंतु मसूर टॉवर, मरोळ, अंधेरी, मुंबई असा त्याचा कायमचा पत्ता आहे. पीडित महिला चिंचवड येथील रहिवासी आहे. सप्टेंबर २०१७ पासून आरोपी पीडितेवर सातत्याने अत्याचार करीत आहे. हिंजवडी, बांद्रा, पुणे, लोणावळा आदी ठिकाणच्या हॉटेलांमध्ये वेळोवेळी नेऊन आरोपीने पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पीडित महिला गरोदर असतानाही त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिचे अश्लील चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करीत होता. तिच्याकडून घेतलेल्या पैशाने सहा ते सात लाखांच्या महागड्या वस्तू आरोपीने खरेदी केल्या. तिचा शारीरिक, मानसिक छळ केला. याप्रकरणी आरोपीविरोधात हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Woman raped by threatening to death