शहराचा नवीन महापौर कोण?

By Admin | Updated: February 3, 2016 00:46 IST2016-02-03T00:46:16+5:302016-02-03T00:46:16+5:30

पुण्याचे महापौर, उपमहापौरांकडे पक्षश्रेष्ठींनी राजीनामा मागितल्याने पिंपरी-चिंचवडच्या महापौर, उपमहापौर बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. नवीन महापौर कोण, याबाबत चर्चा आहे.

Who is the new Mayor of the city? | शहराचा नवीन महापौर कोण?

शहराचा नवीन महापौर कोण?

पिंपरी : पुण्याचे महापौर, उपमहापौरांकडे पक्षश्रेष्ठींनी राजीनामा मागितल्याने पिंपरी-चिंचवडच्या महापौर, उपमहापौर बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. नवीन महापौर कोण, याबाबत चर्चा आहे.
महापौरपद अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहे. प्रभाग क्रमांक ५७ अ (पिंपळे गुरव) येथून शकुंतला धराडे या विद्यमान महापौर आहेत, तर प्रभाग क्रमांक ५६ अ मधून निवडून आलेले रामदास बोकड आणि प्रभाग क्रमांक ३१ अ (दिघी) येथून निवडून आलेल्या आशा सुपे यादेखील एसटी संवर्गातील आहे. यापैकी धराडे यांना महापौरपदी संधी मिळाली आहे. शिवाय ठरल्याप्रमाणे त्यांचा कालावधीही संपुष्टात आला आहे. त्यांच्यानंतर आता सुपे की बोकड यापैकी कोणाला संधी मिळणार याबद्दल उत्सुकता आहे.
महापौर बदलाबाबत अनेकदा चर्चा झाल्या; मात्र, अधिकृत घोषणा झाली नाही. दरम्यान, पुण्यातील बदलानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही बदल केले जातील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.(प्रतिनिधी)
पुण्यात महापौर व उपमहापौरांचे राजीनामे मागण्यात आल्याचे समजते. परंतु पिंपरीतील महापौर, उपमहापौर यांच्या बदलाबाबतचा पक्षश्रेष्ठींकडून अद्याप कसलाही निरोप आलेला नाही. त्यांच्या राजीनाम्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून निर्णय घेतला जाईल.
- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष,
राष्ट्रवादी काँगे्रस

Web Title: Who is the new Mayor of the city?