शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

PCMC Mayor: नवा ‘कारभारी’ कोण? महापालिकेतील ८५ नगरसेवक दावेदार; उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 10:32 IST

Pimpri Chinchwad Municipal Corporation Mayor: दिग्गजांची वरिष्ठ नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद खुले (सर्वसाधारण गट) झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या ८५ नगरसेवकांपैकी कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्गजांनी वरिष्ठ नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षांतर्गत बैठकांना वेग आला असून, नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महापालिकेच्या स्थापनेपासून १९८२ पासून आतापर्यंत सात महिलांनी तर १९ पुरुषांनी महापौरपद भूषविले आहे. यंदा २७व्या वेळी महापौरपद खुल्या गटासाठी जाहीर झाले आहे. निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर ८४ तर एका पुरस्कृतासह एकूण ८५ नगरसेवक निवडून आले आहेत. २०१७ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर २०२२पर्यंत आतापर्यंत दोन पुरुष आणि एका महिला नगरसेविकेला महापौरपदाची संधी मिळाली होती.

-------

अनुभवी की नवखा? भाजपकडून कोणाचे नाव?

१) महापालिकेतील ८५ नगरसेवकांपैकी ४२ पुरुष तर पुरस्कृतासह ४३ महिला सदस्या आहेत. भाजपचे माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव यांना यापूर्वी संधी मिळाली आहे. त्यामुळे यांना पुन्हा संधीची शक्यता कमी आहे. निष्ठावंतांपैकी शीतल ऊर्फ विजय शिंदे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे.

२) महापौरपदासाठी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नितीन लांडगे, सलग दोनदा बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, आमदार शंकर जगताप यांचे विश्वासू ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप, प्रभाग क्रमांक १९ मधील निष्ठावंत मंदार देशपांडे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. महापालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये आलेले राहुल कलाटे, राजू मिसाळ, प्रशांत शितोळे यांचीही नावे चर्चेत आहेत.

----------

महिलांनाही संधी देण्याची शक्यता

महापौरपद भूषविलेल्या नगरसेवकाचा पुढील विधानसभा निवडणुकीसाठी विचार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आगामी राजकीय गणित लक्षात घेता, पुरुष उमेदवारांचा पत्ता कापून महिलांना संधी दिली जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

-----

‘सर्वसाधारण’मध्ये सर्व प्रवर्ग खुले

महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असले, तरी सर्वसाधारण महिला, ओबीसी पुरुष-महिला, अनुसूचित जाती-जमाती या प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांनाही महापौरपदाची संधी मिळू शकते. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली असून, अंतिम निर्णयाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

---

आतापर्यंतचे महापौर (कार्यकाळानुसार)

१) ज्ञानेश्वर लांडगे – १९८६-८७

२) भिकू वाघेरे – ३/८७-८७

३) नाना शितोळे – १९८७-८८

४) तात्या कदम – १९८८-८९

५) कविचंद भाट – १९८९-९०

६) सादबा काटे – १९९०-९१

७) प्रभाकर साठे – १९९१-९२

८) आझम पानसरे – १९९२-९३

९) विलास लांडे – १९९३-९४

१०) रंगनाथ फुगे – १९९४-९५

११) संजोग वाघेरे – १९९५-९६

१२) आर. एस. कुमार – १९९६-९७

१३) अनिता फरांदे – १९९७-९८

१४) हनुमंत भोसले – १९९८-९९

१५) मधुकर पवळे – १९९९-२०००

१६) लक्ष्मण जगताप – २०००-०२

१७) प्रकाश रेवाळे – २००२-०५

१८) मंगला कदम – २००५ ते २००७

१९) डॉ. वैशाली घोडेकर – २००७ ते ०८

२०) अपर्णा डोके – २००८ ते ०९

२१) योगेश बहल – २००९ ते १२

२२) मोहिनी लांडे – २०१२-१४

२३) शकुंतला धराडे – २०१४ ते १७

२४) नितीन काळजे – २०१७ - १८

२५) राहुल जाधव – २०१८-१९

२६) उषा ऊर्फ माई ढोरे – २०१९ ते २२

English
हिंदी सारांश
Web Title : PCMC Mayor Election 2026: Who will be the next leader?

Web Summary : Pimpri-Chinchwad's mayoral seat is open, sparking political activity. Eighty-five corporators are vying for the position. Senior leaders are lobbying, and discussions are underway to determine the next mayor. The city awaits the final decision, with both experienced and new candidates in contention.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६PuneपुणेBJPभाजपाMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६Mayorमहापौर