शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

समाविष्ट गावांचा विकास कधी? कर आकारूनही मिळेना सोयी-सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 1:10 AM

किवळे-विकासनगर : कर आकारूनही सोयी-सुविधा मिळत नसल्याने वाढतेय नाराजी

किवळे : किवळे-विकासनगर व मामुर्डीतील साईनगर भाग वीस वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झाला. मात्र बेस्ट सिटीप्रमाणे या भागाचा विकास झाला नाही. परिणामी नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा भाग पिंपरी-चिंचवड महापालिकेत आहे का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. महापालिका कर इतर भागाप्रमाणे घेते मग इतर भागाप्रमाणे विकास कधी करणार, असा सवाल करदाते व नागरिक करीत आहेत.

विकास आराखड्यानुसार पाण्याची टाकी, बसस्थानक व रस्त्याची काही मोजकी आरक्षणे ताब्यात मिळाल्याचा अपवाद वगळता इतर बहुतांशी आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन विकसित करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने दवाखाना, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, खेळाचे मैदान, उद्यान, वाचनालय, सांस्कृतिक भवन, भाजी मंडई, व्यायामशाळा, दळणवळण साधने आदी प्राथमिक सुविधादेखील नागरिकांना उपलब्ध झालेल्या नाहीत. काही आरक्षणावर अतिक्रमणे झाली आहेत. महापालिकेची आरक्षणे ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेबाबत क्लिष्टता अधिक असल्याने व प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची ओरड संबंधित जागामालक व शेतकरी करीत आहेत. प्रशासन समाविष्ट गावांच्या विकासाबाबत ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे विकास ठप्प झाला आहे.

विकासनगरमध्ये प्राथमिक शाळा इमारत महापालिकेने बांधली आहे़ मात्र खेळाचे मैदान नसल्याने मुलांनी खेळायचे कुठे, असा सवाल पालक विचारित आहेत. मराठी माध्यमिक शाळा नसल्याने माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना देहूरोड, निगडी, आकुर्डी, प्राधिकरणात जावे लागत आहे. एवढ्या वर्षात एकही दवाखाना अगर बाह्य रुग्ण विभाग सुरू करणे महापालिकेला शक्य झालेले नाही. त्यामुळे खासगी डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. नागरिकांसाठी एकही वाचनालय नाही. सांस्कृतिक भवन, अगर हॉल नसल्याने घरगुती कार्यक्रम करण्यासाठी मर्यादा येत आहेत. सुविधायुक्त बगीचा व खेळाची मैदाने नाहीत. याबाबत २० वर्षांत महापालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी महापालिकेचे विविध व भरमसाठ कर आम्ही का भरावेत, असा सवाल केला आहे. गेल्या २० वर्षांतील महापालिकेने आकारलेल्या सर्व करांत मोठी सवलत देण्यासाठी प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे़वीस वर्षांपूर्वी ११ सप्टेंबर १९९७ ला महापालिका हद्दीलगतची अठरा गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली होती. किवळे गावठाण परिसरापेक्षा विकासनगर भागात १९९७ पूर्वीच गुंठा-दोन गुंठे जागा घेऊन अनेकांनी घरे बांधली होती. देहूरोड बाजारपेठ, पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग व देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ असल्याने विकासनगरला स्थायिक होणारांची संख्या वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. समविष्ट गावात २००२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर थोड्या प्रमाणात कामे सुरू झाली़ काही गटारी बांधण्यात आल्या आहेत.शेतकऱ्यांची संमती मिळवून जागा ताब्यात घेऊन किवळे -विकासनगर, उत्तमनगर, दत्तनगर व साईनगर येथील पाच डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. पाण्याची टाकी, नाला बांधणी कामे झाली़ मात्र विविध आरक्षणे ताब्यात नसल्याने विकास करण्यास अडचण येत आहे.- बाळासाहेब तरस,माजी नगरसेवकगेल्या दीड वर्षात अनेकदा पाठपुरावा करूनही महापालिकेने विविध आरक्षणे ताब्यात घेतली नसल्याने नागरिकांना आधुनिक नागरी सुविधा पुरविताना अडचणी येत आहेत. उद्यान, दवाखाना, सांस्कृतिक भवन, भाजीमंडई व खेळाचे मैदानासाठी प्रयत्न सुरू आहेत.- संगीता भोंडवे, नगरसेविकाआरक्षणे ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेबाबत क्लिष्टता अधिक असल्याने व प्रशासनाने योग्य माहिती भूखंडधारक व शेतकरी यांना देणे गरजेचे आहे. विश्वासात घेतल्यास व निश्चित परतावा आदी बाबत मुदत दिल्यास आरक्षित भूखंड ताब्यात देताना जागामालक लवकर तयार होतील. प्रशासनाने त्यासाठी वेगळा विभाग स्थापन करावा.- सुदाम तरस,माजी सरपंच, किवळे़ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी