शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीचा निर्णय होणार कधी?

By admin | Updated: August 8, 2015 00:37 IST

फेब्रुवारी २०१७मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे प्रारूप प्रभाग रचनेबाबत नकाशे पाठविण्याचे काम आॅगस्टअखेर पूर्ण होणार आहे. एकसदस्यीय की बहुसदस्यीय प्रभाग पद्धती

पिंपरी : फेब्रुवारी २०१७मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे प्रारूप प्रभाग रचनेबाबत नकाशे पाठविण्याचे काम आॅगस्टअखेर पूर्ण होणार आहे. एकसदस्यीय की बहुसदस्यीय प्रभाग पद्धती या राज्य शासनाच्या निर्णयानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. शहराच्या लगतची गावे, समाविष्ट करून घेण्यासंदर्भात सप्टेंबर २०१६पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांनी निर्णय घ्यावा, त्यानंतर कोणतीही हद्दवाढ करता येणार नाही, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिल्याने हद्दवाढीचा निर्णय कधी होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.महापालिका निवडणूक सव्वा वर्षावर येऊन ठेपल्याने याविषयीची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. त्यांना निवडणूक कोणत्या प्रभागरचनेनुसार होणार, याची उत्सुकता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभाग रचनेचे काम जून महिन्यापासून सुरू झाले आहे. त्यानुसार महापालिकेतील निवडणूक विभाग कामाला लागला आहे. २०१२ची निवडणूक द्विसदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाली होती. त्यात बदल करण्याचे संकेत भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दिले आहे. त्यामुळे एक, दोन की तीन, चार सदस्यीय प्रभाग असेल, याबाबत राज्य सरकारचा निर्णय झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. गूगल मॅपचा आधार घेऊन २०११च्या जनगणनेनुसार महापालिकेची लोकसंख्या १७ लाख २९ हजार ६९२ एवढी आहे. या लोकसंख्येचे गट तयार करून ते गट एकत्रित करून नकाशा तयार केला आहे. सीमानिश्चितीसाठी मुख्य रस्ते, नदी, रेल्वेलाइन यांचा आधार घेतला आहे. त्यानुसार १५० घरे अथवा ८०० लोकसंख्येचा एक गट तयार केला आहे. असे एकूण ३१०२ गटांचा अधार घेऊन नकाशा तयार करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. तयार केलेल्या नकाशानुसार चतु:सीमा तपासणीचे काम सुरू झाले आहे. नकाशा, परिसर आणि हद्द याविषयीची पाहणी कार्यकारी अभियंता आणि ज्युनियर इंजिनियर असे १३३ कर्मचारी करीत आहेत. तपासणी झाल्यानंतर ३१ आॅगस्टपर्यंत हे नकाशे महाआॅनलाइनवर अपलोड करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)