शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

अफाट जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जेव्हा मजूर महिला होते बारावी उत्तीर्ण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 8:52 PM

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मजूर महिलेने पतीच्या निधनानंतर कुटुंब सांभाळत हे यश मिळविले आहे...

ठळक मुद्दे बारावीच्या परीक्षेत ५६ टक्के गुण

पिंपरी : महापालिकेतील नगरसचिव विभागातील मजूर महिलेने नोकरी करून बारावीच्या परिक्षेत यश मिळविले आहे. शिला लक्ष्मण सूर्यवंशी असे त्या महिलेचे नाव असून शिक्षणाविषयी असलेल्या जिद्दीबद्दल महापालिकेत कौतुक होत आहे. बारावीची निकालपत्र हाती पडल्यानंतर सूर्यवंशी यांच्या चेहऱ्यावर अवर्णनीय असा आंनद पाहायला मिळाला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल आज लागला. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मजूर महिलेने कुटुंब सांभाळत यश मिळविले आहे. बारावीच्या परीक्षेत ५६ टक्के गुण मिळविले आहेत. सूर्यवंशी या मूळच्या जळगावच्या असून कामगारनगरमध्ये राहतात. त्यांनी जळगाव येथून १४ वर्षांपूर्वी दहावीची परीक्षा दिली होती. मात्र, पुढे लग्न झाल्यानंतर त्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले होते. त्यानंतर लग्न होऊन पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यानंतर काही वर्षांत पतींचा मृत्यू झाला. त्यामुळे सासू सासरे आणि दोन मुले अशी कुटुंबाची जबाबदारी सूर्यवंशी यांच्यावर आली. त्यांना अनुकंपा तत्वावर महापालिकेत मजूर या पदावर नोकरी मिळाली. सध्या नगरसचिव कार्यालयात शिपाई म्हणून काम पाहत आहेत. त्यांना दोन अपत्ये असून मोठी मुलगी सातवीत दुसरे अपत्य तिसरीत शिक्षण घेत आहे. शिला सूर्यवंशी म्हणाल्या, ह्यह्यशिक्षण घेण्याची आवड होती. मात्र, परिस्थिमुळे शिक्षण थांबले. पुढे कुटुंबाची जबाबदारी आली. माझी मुलगी सातवीत आहे. आमच्या विभागातील सहकार्यांनी मला प्रोत्साहन दिले म्हणून परिक्षा दिली. नोकरी आणि कुटुंब सांभाळून अभ्यास केला. आणि आज उत्तीर्ण झाले. खूप आनंद झाला आहे. ह्णह्णकुटुंबावर आलेली जबाबदारी पेललीशिक्षणाविषयी असणारी जिद्द आणि अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा चंग त्यांनी बांधला आणि चिंचवड येथील फत्तेचंद जैन शाळेत प्रवेश घेतला. यासाठी नगरसचिव विभागातील सहकार्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. फेब्रुवारीत झालेल्या बारावीची परिक्षा दिली. महिलेच्या शिक्षणविषयक जिद्दीला महापालिकेने सलाम केला आहे. सूर्यवंशी यांच्या यशाबद्दल स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसचिव उल्हास जगताप उपस्थित होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHSC Exam Resultबारावी निकालWomenमहिला