शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? पिंपरी-चिंचवडकरांनी 'या'दिवशी मोडले नाहीत प्रशासनाचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 20:26 IST

पोलिसांनी एकही खटला दाखल केला नाही... 

ठळक मुद्देजमावबंदी, फिजिकल डिस्टन्सिंग यासारख्या नियमांचे केले पालन

पिंपरी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीसह काही निर्बंध लागू आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाचे नियम मोडणाºया नागरिकांवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १९ मार्च २०२० पासून कारवाई होत आहे. भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये कारवाई होते. मात्र सोमवारी (दि. १४) एकाही नागरिकाने नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे पोलिसांकडून देण्यात येणाºया आकडेवारीवरून दिसून येते.   

लॉकडाऊन शिथील झाला असला तरी कोरोना महामारी रोखण्यासाठी साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू आहे. त्यानुसार जमावबंदी आहे. मात्र काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. तसेच मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सुरक्षा साधनांचा वापर न करणे व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन काही नागरिकांकडून केले जाते. अशा नागरिकांवर पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

पिंपरी शहरातील कारवाईबाबत दररोज आकडेवारी देण्यात येते. त्यानुसार, सोमवारी (दि. १४) शहरातील एकाही नागरिकावर प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सोमवारी सर्व नागरिकांनी नियमांचे पालन केले असून एकाही नागरिकाने नियम मोडले नसल्याचे दिसून येते. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित नागरिकावर भादवि कलम १८८ अन्वये खटला दाखल केला जातो. त्यात त्याला कारावास अथवा आर्थिक दंड केला जात आहे. नियमभंग केल्याप्रकरणी दररोज शेकडो नागरिकांवर पोलिसांकडून अशी कारवाई केली जात आहे. 

एकही गुन्ह्याची झाली नव्हती नोंद कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. जनता कर्फ्यू असल्याने गुन्हेगार तसेच नागरिकही घरातच होते. त्यामुळे २२ मार्च रोजी शहरात एकही गुन्हा झाल्याची नोंद नाही. त्यापाठोपाठ लॉकडाऊन काळात २ मे रोजी त्याचीच पुनरावृत्ती झाली. त्यामुळे २ मे रोजी देखील एकही गुन्हा नोंद झाला नाही. त्यानंतर लॉकडाऊन काळात १४ सप्टेंबर हा तिसरा असा दिवस आहे, ज्या दिवशी नागरिकांनी नियमभंग केल्याची नोंद नाही. त्यामुळे नागरिकांवर सोमवारी (दि. १४) नियमभंगप्रकरणी एकही कारवाई झाली नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या