शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचा घाट, महापालिका प्रशासनाचे गौडबंगाल : काळ्या यादीतील ठेकेदाराला काम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 03:17 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील कच-याच्या गंभीर प्रश्नाचे पडसाद उमटले. भाजपाच्या नगरसेवकांनीही कचराप्रश्नी सत्ताधाºयांना घरचा आहेर दिला. कचरा प्रश्न सुटला नाही, तर प्रभाग कार्यालय, तसेच आयुक्त कार्यालयात कचरा टाकण्यात येईल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कच-याच्या गंभीर प्रश्नाचे पडसाद उमटले. भाजपाच्या नगरसेवकांनीही कचराप्रश्नी सत्ताधाºयांना घरचा आहेर दिला. कचरा प्रश्न सुटला नाही, तर प्रभाग कार्यालय, तसेच आयुक्त कार्यालयात कचरा टाकण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षातील नगरसेवकांनी दिला.प्रशासनामुळेच कचरा व्यवस्थापन विस्कटले आहे, असा आरोप करीत सत्ताधारी आणि विरोधकांनीही प्रशासनास धारेवर धरले. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात काळ्या यादातील ठेकेदाराला काम देण्याचा घाट घातला जात आहे. यातील गौडबंगाल काय, असा प्रश्नही नगरसेवकांनी उपस्थित केला.महापालिकेची सर्वसाधारण सभा आज झाली. सहा महिन्यांपासून शहरभरातील कचरा नियोजन विस्कटले आहे. त्याचे पडसाद सभेत उमटले. मागील महिन्यातील तहकूब सभेचे कामकाज दुपारी एकला सुरू झाले. त्या वेळी पहिला आणि दुसरा विषय तहकूब करण्यात आला. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या निधीचा विषय चर्चेला आल्यानंतर आरोग्याच्या समस्येवर सत्ताधारी आणि विरोधकांनी फटाके फोडले. या विषयी चर्चेस सुरुवातीला भाजपाचे नगरसेवक राहुल जाधव यांनी कचरा प्रश्न गंभीर झाल्याचे सांगितले. मीनल यादव यांनी घरोघरचा कचरा उचलला जात नाही. तक्रारी करूनही प्रशासन दाद देत नाही. टाळाटाळ करते, असा आरोप केला. अभिषेक बारणे यांनी अधिकारी नगरसेवकांचे ऐकत नाही, याविषयी नाराजी व्यक्त केली.आंदोलक नगरसेवकांवर गुन्हा‘स्वच्छ भारत अभियान’ हे केवळ फोटोसाठी झाले आहे. महापालिकेत कचरा टाकून निषेध आंदोलन केले, तर नगरसेवकांवर गुन्हा दाखल होतो. मग आम्ही दाद कोणाकडे मागायची, असे दत्ता साने म्हणाले. मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले, कचरा प्रश्न सुटला नाही, तर आयुक्त कार्यालय, प्रभाग कार्यालयात कचरा टाकला जाईल, करा किती गुन्हे दाखल करायचे ते.’’कच-याचे गौडबंगाल काय ?शिवसेनेचे नगरसेवक नीलेश बारणे म्हणाले, ‘‘वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे काम राजकोटमध्ये काळ्या यादीतील ठेकेदारास दिले आहे. कचºयाचे गौडबंगाल काय याचा शोध घ्यायला हवा.’’ शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘सत्ता येऊन सहा महिने झाले, तरी कचरा प्रश्न सुटलेला नाही. असे का होते याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.’’सीमा सावळे : ठेकेदार कोणाचे हे तपासाकच-याची समस्या आहे, हे वास्तव यापूर्वीच्या कचराविषयक ६७ संस्थांनी कर्मचाºयांचे ईएसआय आणि पीएफचे पैसे भरलेले नव्हते. त्यामुळे कष्टक-यांची पिळवणूक होत होती. त्यामुळे नवीन प्रक्रिया करताना अटी आणि शर्तीत बदल केला आहे. गोरगरिबांच्या अधिकारांना संरक्षण मिळायला हवे. महापालिकेसमोर कचरा टाकल्यानंतर उचलला नाही, म्हणून संबंधितांवर गुन्हा दाखल झाला. स्वच्छ भारत अभियान फोटो सेशनसाठी नव्हते. त्या दिवशी आम्ही पाच किलोमीटरचा कचरा उचलला होता, असे सीमा सावळे यांनी सांगितले.नियोजनशून्य कारभाराचा फटका : योगेश बहलमंगला कदम म्हणाल्या, ‘‘भाजपाच्या नगरसेवकांनी कचराप्रश्नी घरचा आहेर दिला आहे. गेल्या पंधरा वर्षांत कधी कचºयाची समस्या नव्हती. आता निर्माण झाली आहे. त्यात राजकारण करू नये.’’ विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, ‘‘आरोग्यबाबत मनमानी सुरू आहे. नियोजनशून्य कारभार सुरू आहे. प्रभाग चुकीच्या पद्धतीने फोडल्याने ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. सल्लागार जगविण्याचे काम सुरू आहे.’’ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘कचरा समस्येवरून दिवाळीचे फटाके उडाले आहेत. आम्ही काय काम करतो. यासाठी अजित पवारांच्या सर्टिफिकेटची गरज नाही.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड