वाकड : जुन्या भांडणाचा राग त्यातच राजकीय द्वेष व व्हाट्स अॅपवर पोस्ट टाकण्याच्या चढाओढीतून जांबे (मुळशी) गावातील शेजाऱ्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. यात माजी ग्रामपंचायत सदस्यावर कोयत्याने वार करुन त्यांचा मुलगा पुतण्यासह काही महिलांना मारहाण करत जखमी केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि २१) रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडला. माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश अडसुळे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. तर त्यांचा मुलगा अनिकेत अडसुळे व पुतण्या बंटी अडसुळे व त्यांच्या घरातील महिलांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी धर्मा गायकवाड त्याचा पुतण्या सोन्या याच्यासह अन्य पाच सहा जणांना ताब्यात घेतले असून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी गणपती मंडळाचे फोटो व स्टेटस व्हाट्स अपवर टाकण्यावरून धुसफुस सुरू होती. आज त्याचे पर्यावसान भांडणात झाले. गायकवाड यांनी बाहेरील गुंड आणून घरात घुसून महिलांना देखील मारहाण केल्याचा आरोप अडसूळे कुटुंबियांनी करत अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.
माजी ग्रामपंचायत सदस्यावर कोयत्याने वार : जांबेत दोन गटात हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 19:56 IST
जुन्या भांडणाचा राग त्यातच राजकीय द्वेष व व्हाट्स अॅपवर पोस्ट टाकण्याच्या चढाओढीतून जांबे (मुळशी) गावातील शेजाऱ्यांच्या दोन गटात हाणामारी झाली.
माजी ग्रामपंचायत सदस्यावर कोयत्याने वार : जांबेत दोन गटात हाणामारी
ठळक मुद्देफिर्यादींकडून अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी