नियोजन शून्य कामामुळे पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:58 PM2019-11-20T12:58:42+5:302019-11-20T13:00:43+5:30

नागरिक संतप्त,प्रशासन हतबल

Water wasted due to no planning | नियोजन शून्य कामामुळे पाण्याची नासाडी

नियोजन शून्य कामामुळे पाण्याची नासाडी

googlenewsNext
ठळक मुद्देरस्त्याचे खोदकाम करताना अनेकदा पाण्याच्या पाईपलाईन फुटून पाण्याची नासाडी

चिंचवड: पाणी पुरवठा यंत्रणेच्या नियोजनात असफल होत असलेल्या महानगर पालिका प्रधासनाच्या विरोधात नागरिक संतप्त व्यक्त करीत आहेत. पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन करणाऱ्या पालिकेच्या 'ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालया सामोर आज लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचा प्रकार घडला आहे.पाईप लाईन फुटल्याने डोळ्यासमोर पाणी वाहत असताना प्रशासन हतबल झाल्याने नागरिक संतप्त व्यक्त करीत आहेत.
पाण्यासाठी शहरात नियोजन करण्यात येत आहे.सोमवार पासून दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी चिंचवड मधील उद्योग नगरातील ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर खोदकामामुळे पाईपलाईन फुटून आज पहाटे पासून पाणी रस्त्यावर वहात होते.या वेळी आज कार्यालयात मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.मात्र येथील पाणी गळती थांबविण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत.यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले.
उद्योगनगर भागात तीन दिवसांपासून अंतर्गत केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे.या कामामुळे याज प्रभाग कार्यलयाच्या प्रवेशद्वारावर पाण्याची पाईपलाईन फुटल्याचे दिसून आले.रस्त्यावर वाहणारे पाणी पाहून नागरिक संतप्त व्यक्त करीत होते. मात्र पालिका प्रशासनाला या बाबत गांभीर्य नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
रस्त्याचे खोदकाम करताना अनेकदा पाण्याच्या पाईपलाईन फुटून पाण्याची नासाडी होत असल्याचे प्रकार घडत असतात.मात्र पालिका प्रशासन संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पाणी बचतीसाठी ज्ञान वाटणाऱ्या पालिका प्रशासनने स्वत: नियोजनात तत्पर राहावे अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
फोटो:चिंचवड मधील 'ब प्रभाग' क्षेत्रीय कार्यालया समोर पाण्याची पाईपलाईन फुटून पाण्याची नासाडी झाली आहे.

Web Title: Water wasted due to no planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.