शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद
By Admin | Updated: January 20, 2016 01:14 IST2016-01-20T01:14:47+5:302016-01-20T01:14:47+5:30
निगडीतील सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीची कामे करावयाची असल्याने गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद
पिंपरी : निगडीतील सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीची कामे करावयाची असल्याने गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
गुरुवारी सकाळी काही भागांत पाणीपुरवठा करण्यात येईल. मात्र, सायंकाळी सर्व भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ज्या भागात सध्या सायंकाळी एक वेळ पाणीपुरवठा केला जातो, त्या भागास शक्यतेनुसार सकाळच्या वेळी पाणीपुरवठा केला जाईल. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. दरम्यान शहरामध्ये
पाणी कपात सुरू आहे. तरीही काहीजण पाण्याचा अपव्यय
करत आहेत. हे रोखण्यासाठी पालिकेने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. परंतु पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.(प्रतिनिधी)