शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

रसायनांचेच पाणी..! प्रदूषणाचे घटक पिण्याच्या पाण्यात?

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 8, 2025 16:05 IST

पवनेचे प्रदूषित पाणी शुद्ध करण्यासाठी दररोज २ हजार ५०० टन क्लोरिन गॅस

- ज्ञानेश्वर भंडारेपिंपरी : शहरात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे २२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. दूषित पाण्याद्वारे आजाराचा सर्वाधिक प्रसार होत असल्याने शहरातील खासगी विहिरी, बोअर, टँकर आणि जारमधील पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील ३० लाख नागरिकांना पवना नदीतून उचललेले प्रदूषित पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत.

महापालिकेने पवना नदीतील पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. शिवाय शहरातील नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्यासाठी बंदिस्त पवना जलवाहिनीचा प्रश्नदेखील १४ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करताना महापालिकेकडून प्रदूषित पाण्यावर रसायनांचा मारा करूनच द्यावे लागत आहे. पण, महापालिकेने पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.

जलशुद्धीकरण करण्यासाठी रसायनांचा उतारा

शहरातील सुमारे ३० लाख नागरिकांना पिण्यायोग्य पाणी देण्यासाठी निगडीच्या सेक्टर २३ मध्ये सन २०२० -२०२१ मध्ये वर्षभरासाठी १५० टन ब्लिचिंग पावडर लागली. तीदेखील शिल्लक राहिली. आता २०२३ - २०२४ मध्ये वर्षभरासाठी ३५० ते ४०० टन ब्लिचिंग पावडर लागली. पावसाळ्यात दररोज २ किलो तुरटी लागत होती. ती आता दररोज ८ किलो लागत आहे. पूर्वीचे टीडीएसचे प्रमाण ६० ते ७० पीपीएम होते. ते आता १०० ते ११० पीपीएमपर्यंत गेले आहे.

बंदिस्त जलवाहिनी आवश्यक

महापालिकेने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प २००८ मध्ये हाती घेतला. मात्र, २०११ मध्ये मावळातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तो रखडला. आता राज्य सरकारने प्रकल्पावरील स्थगिती उठविली आहे. त्यामुळे बंदिस्त जलवाहिनीचा मार्ग मोकळा झाला आहे. थेट पवना धरणातून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात ४८० एमएलडी पाणी बंदिस्त जलवाहिनीतून आणण्यात येणार आहे. धरण ते निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत अशा एकूण ३४.७१ किलोमीटर अंतराची समांतर जलवाहिनी टाकण्यात येणार होती. त्यापैकी महापालिका हद्दीतील ४.४० किलोमीटर भूमिगत जलवाहिनीचे काम पूर्ण झाले होते. पवनेच्या प्रदूषणामुळे बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तातडीने होणे आवश्यक आहे.

पवना नदी उगम स्थानापासून रावेत उपसा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नदीचे प्रदूषण वाढत चालले आहे. नागरिकांना पिण्यायोग्य पाणी आम्ही देत आहोत. परंतु, पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक रसायनांचा वापर होऊ लागला आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जेणेकरून पिंपरी-चिंचवडकरांना प्रदूषणविरहित पाणी मिळण्यास मदत होईल. - प्रशांत जगताप, मुख्य रसायनी, जलशुद्धीकरण केंद्र, निगडी 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेHealthआरोग्यWaterपाणीwater pollutionजल प्रदूषण