औद्योगिक क्षेत्रात गुरुवारी पाणी बंद

By Admin | Updated: November 16, 2016 02:44 IST2016-11-16T02:44:52+5:302016-11-16T02:44:52+5:30

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्राच्या मुख्य जलवाहिनीचे स्थापत्य काम करण्यासाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद

Water closure in the industrial area Thursday | औद्योगिक क्षेत्रात गुरुवारी पाणी बंद

औद्योगिक क्षेत्रात गुरुवारी पाणी बंद

पिंपरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्राच्या मुख्य जलवाहिनीचे स्थापत्य काम करण्यासाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे़
सकाळी सहा ते रात्री आठ दरम्यान भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अ‍ॅण्ड डी, व्ही़ एस़ एऩ एल, दिघी, तळवडे, चाकण, देहूरोड, ओएफ डीआर या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे़ शुक्रवारी पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे उद्योजक व नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होणार
आहे. रहिवाशांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन कार्यकारी अभियंत्यांनी (स्थापत्य विभाग) केले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Water closure in the industrial area Thursday