शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कचऱ्यापासून वीजनिर्मिती, आयुक्त श्रावण हर्डीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:30 IST

 पिंपरी : कचऱ्यापासून वीजनिर्मितीसाठी महापालिकेचा प्रयत्न आहे. यासाठी नुकतीच एक बैठक झाली. यामध्ये ६० एजन्सींनी सहभाग घेतला. हॉटेलचा दररोज ५० टन कचरा निर्माण होते. यापासून सीएनजी तयार करण्याचे नियोजन आहे. घरोघरी निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करणारी एखादी संस्था आली, तर त्याचाही महापालिका सकारात्मक विचार करेल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर ...

 पिंपरी : कचऱ्यापासून वीजनिर्मितीसाठी महापालिकेचा प्रयत्न आहे. यासाठी नुकतीच एक बैठक झाली. यामध्ये ६० एजन्सींनी सहभाग घेतला. हॉटेलचा दररोज ५० टन कचरा निर्माण होते. यापासून सीएनजी तयार करण्याचे नियोजन आहे. घरोघरी निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करणारी एखादी संस्था आली, तर त्याचाही महापालिका सकारात्मक विचार करेल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.महापालिकेचे आयुक्त हर्डीकर यांनी विविध प्रश्नांवर माध्यमांशी संवाद साधला. त्यात उपसूचनांचा विषय, कचºयापासून वीजनिर्मिती, पाणीपुरवठा आणि स्मार्ट सिटी अशा विविध प्रकल्पांबद्दल ‘सद्य:स्थिती काय’ या विषयी माहिती दिली.विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी ४४६ निविदा त्वरित रद्द कराव्यात, अशी मागणी केली होती. त्यावर आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘पालिकेच्या अर्थसंकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. महासभेत झालेले ठराव बेकायदा नाहीत. कायदेशीर ठरावाचीच प्रशासन अंमलबजावणी करणार आहे. तसेच सभेत आलेल्या उपसूचना नगरसचिवांना तपासण्याची सूचना केली आहे.’’स्मार्टला लवकरच निधीस्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारकडून लवकरच निधी मिळेल. स्मार्ट सिटीचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयएएस अधिकारी अथवा तज्ज्ञ व्यक्तीचा शोध सुरू आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कामकाज करण्यासाठी काही पदे भरणे गरजेचे आहे. ते भरण्यात येणार आहेत, तर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची पुढच्या आठवड्यात पहिली बैठक होईल, असेही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.पाण्याच्या पुनर्वापरासाठी पॉलिसी तयार करूहर्डीकर म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याचीही गरज वाढणार आहे. प्रामुख्याने पाणीगळती रोखणे, पाण्याची उपलब्धता वाढविणे यासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पॉलिसी तयार करण्याचे विचाराधीन आहे. अमृत योजनेतील ४० टक्के शहरासाठी चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम पावसाळा संपल्यानंतर वेगात सुरू होईल.’’