प्रभाग पद्धतीनुसार इच्छुकांचे आडाखे

By Admin | Updated: January 9, 2016 01:35 IST2016-01-09T01:35:52+5:302016-01-09T01:35:52+5:30

आगामी महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार की, वॉर्ड पद्धतीने याबाबत संभ्रम असतानाच गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका

As per the ward method, | प्रभाग पद्धतीनुसार इच्छुकांचे आडाखे

प्रभाग पद्धतीनुसार इच्छुकांचे आडाखे

पिंपरी : आगामी महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार की, वॉर्ड पद्धतीने याबाबत संभ्रम असतानाच गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुका प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातही विविध पक्षांच्या राजकीय पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांकडून आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेबु्रवारी २०१७ मध्ये होत आहे. त्या दृष्टीने प्रशासनासह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदारयादी आदी गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठवले जात आहे. आरक्षण कसे पडेल, कुठला प्रभाग राखीव असेल, आपणाला कुठून संधी मिळेल, यासह वार्ड अथवा प्रभागरचना कशी असेल, कुठला भाग आपल्याकडे आल्यास फायदा होऊ शकतो आदींबाबत आडाखे बांधले जात आहेत. यातील प्रमुख मुद्दा म्हणजे निवडणूक प्रभागानुसार होणार की, वॉर्डनुसार हा समजला जात आहे. त्यातच २०१२ ची निवडणूक प्रभाग पद्धतीने झाल्याने आगामी निवडणूक वॉर्ड पद्धतीने होईल, असा अनेकांना अंदाज होता. त्यानुसार प्रशासनासह इच्छुकांनीही तयारी सुरू केली आहे. मात्र, गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी प्रभाग पद्धतीने निवडणुका होणार असल्याचे संकेत दिल्याने राजकीय गणिते बदलावी लागणार आहेत.
यंदा पुन्हा प्रभाग पद्धतीने निवडणूक झाल्यास कोणाला फायदा आणि कोणाला फटका बसेल, तसेच वॉर्ड पद्धतीने झाल्यास काय होईल, याबाबतही चर्चा होती. प्रभाग पद्धतीत दोन अथवा त्यापेक्षा अधिक नगरसेवक असतात. त्यांच्यात वाद असल्यास त्याचा विकासकामांवर परिणाम होतो. तर वॉर्डमध्ये स्वतंत्ररीत्या काम करता येते. त्यामुळे वॉर्ड पद्धतीने निवडणूक झाल्यास फायदेशीर ठरेल, असे प्रादेशिक पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: As per the ward method,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.