मतदार जागृती अभियान
By Admin | Updated: February 13, 2017 01:49 IST2017-02-13T01:49:51+5:302017-02-13T01:49:51+5:30
परिवर्तन आणि एनसीसी एकत्रितपणे मतदार जागृती अभियान राबवणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने यासाठी सर्व आवश्यक सहकार्य दिले आहे.

मतदार जागृती अभियान
पिंपरी : परिवर्तन आणि एनसीसी एकत्रितपणे मतदार जागृती अभियान राबवणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने यासाठी सर्व आवश्यक सहकार्य दिले आहे.
२००९ पासून आजवर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत परिवर्तनने मतदार जागृतीचे काम केले आहे. २०१३ मध्ये परिवर्तनने राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनसीसी) स्वयंसेवकांच्या सहकार्याने मतदार नोंदणी अभियान राबवत तब्बल ४०,००० पेक्षा जास्त नागरिक व विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी केली होती. त्याच पद्धतीने पुन्हा एकदा अभियान राबविले जाणार आहे.
प्रत्येक कॉलेजच्या एनएसएसच्या दोन विद्यार्थी समन्वयकांचे मतदार जागृतीसाठी आज परिवर्तनतर्फे प्रशिक्षण घेण्यात आले. १४ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी यादरम्यान रोज सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेमध्ये, शहराच्या वेगवेगळ्या भागात हे जागृती अभियान राबविले जाईल.
प्रमुख रस्ते, चौक, उद्याने अशा ठिकाणी विद्यार्थी कार्यकर्ते नागरिकांना मतदानाचं महत्त्व सांगतील व मतदान करण्याविषयी आवाहन करतील. (प्रतिनिधी)