शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

लोकसेवकांचे व्हिजिटिंग कार्ड, प्रमाणपत्र, गॅझेट, सभावृत्तांताचे केले संकलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 4:14 PM

व्हिजिटींग कार्डसह फोटो, प्रमाणपत्र, गॅझेट, महापालिकेमधील सर्व ठराव सभावृत्तांत इत्यादी दस्ताचेही संकलन त्यांनी केले आहे.

ठळक मुद्देसंभाजी बारणे यांचा छंद : अनोख्या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद 

पिंपरी : काही माणसे छंदवेडी असतात. यात विविध वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद काही जणांना असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारे लोकसेवकांच्या व्हिजिंटिंग कार्ड संकलित करण्याचा अनोखा छंद थेरगाव येथील अवलियाने जोपासला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीचे सदस्य असलेल्या संभाजी बाळासाहेब बारणे यांनी हा अभिनव उपक्रम राबविला. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली. व्हिजिटींग कार्डसह फोटो, प्रमाणपत्र, गॅझेट, महापालिकेमधील सर्व ठराव सभावृत्तांत इत्यादी दस्ताचेही संकलन त्यांनी केले आहे. उद्योगनरीसाठी हा ऐतिहासिक दस्त आहे. तो भावी पिढीस प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास संभाजी बारणे यांनी व्यक्त केला आहे. ४ मार्च १९७० रोजी पिंपरी चिंचवड नगरपालिका अस्तित्वात आली. त्यानंतर २० मार्च १९७८ रोजी नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली. १९ ऑक्टोबर १९८२ रोजी महापालिका अस्तित्वात आली. महापालिकेची पहिली निवडणूक १९८६ मध्ये झाली. त्यानंतर २०१७ पर्यंत पंचवार्षिक निवडणुका झाल्या. १९७० ते २०१७ या कालावधीत नवनगरपालिका व महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांचे व स्वीकृत सदस्य, नामनिर्देशित सदस्य तसेच नगरपिता, सदस्य, सभासद अशा विविध पदांवर कार्य केलेल्या लोकसेवकांच्या व्हिजिटींग कार्डचा संग्रह बारणे यांनी केला आहे. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने १७ मे २०१९ रोजी जाहीर केली. तसे प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे मुख्य संपादक डॉ. विश्वरूप रॉय चौधरी यांनी  बारणे यांना प्रदान करून त्यांचा सन्मान केला आहे.  मॅक्सिमम कलेक्शन ऑफ व्हिजिटिंग कार्डस् ऑफ म्युनसिपल कापोर्रेशन या नावाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. यात बारणे यांनी आजी-माजी नगरसेवकांच्या १२३२ व्हिजिटींग कार्ड, ७६८ फोटोग्राफ आणि २४४ प्रमाणपत्रांचा संग्रह केला आहे.  

उपक्रमाविषयी माहिती देताना संभाजी बारणे म्हणाले, काही सदस्यांनी त्यांचे व्हिजिटींग कार्ड संदर्भ म्हणून मला दिले होते. या व्हिजिटिंग कार्डचे संकलन करण्याचे ठरविले. त्यावेळी माज्याकडे केवळ पाच टक्के व्हिजिटींग कार्ड होते. त्यानंतर संग्रह करण्याबाबत निश्चय करून नगरपालिका, महापालिका स्थापनेपासून आजपर्यंतची सर्व सदस्यांची व्हिजिटींग कार्ड, फोटो, प्रमाणपत्र, गॅझेट, महापालिकेमधील सर्व ठराव सभावृत्तांत इत्यादी दस्त मिळविण्यासाठी पाठपुरावा केला.

पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून २०१२ व २०१७ मधील महापालिका सदस्यांचे निवडून आल्याचे प्रमाणपत्र माहितीचा अधिकार कायदयान्वये मिळविले. अनेक सदस्यांनी त्यांच्या माहितीचा व अनुभवाचा अनमोल खजिना शब्दरुपाने व कागदोपत्री मला दिला. त्याविषयी लवकरच पुस्तक प्रकाशन करून ती उद्बोधक माहिती समाजापुढे मांडण्याचा मानस आहे. मात्र, अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या संपर्क होऊ शकला नाही. देशात अशाप्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच झाला. त्यामुळे त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे....................इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे मुख्य संपादक डॉ. विश्वरूप रॉय चौधरी यांनी बारणे यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करून त्यांचा सन्मान केला आहे.  मॅक्सिमम कलेक्शन ऑफ व्हिजिटिंग कार्डस् ऑफ म्युनसिपल कापोर्रेशन या नावाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. यात बारणे यांनी आजी-माजी नगरसेवकांच्या १२३२ व्हिजिटींग कार्ड, ७६८ फोटोग्राफ आणि २४४ प्रमाणपत्रांचा संग्रह केला आहे.  उपक्रमाविषयी माहिती देताना संभाजी बारणे म्हणाले, ह्यह्यकाही सदस्यांनी त्यांचे व्हिजिटींग कार्ड संदर्भ म्हणून मला दिले होते. या व्हिजिटिंग कार्डचे संकलन करण्याचे ठरविले. त्यावेळी माज्याकडे केवळ पाच टक्के व्हिजिटींग कार्ड होते. त्यानंतर संग्रह करण्याबाबत निश्चय करून नगरपालिका, महापालिका स्थापनेपासून आजपर्यंतची सर्व सदस्यांची व्हिजिटींग कार्ड, फोटो, प्रमाणपत्र, गॅझेट, महापालिकेमधील सर्व ठराव सभावृत्तांत इत्यादी दस्त मिळविण्यासाठी पाठपुरावा केला. पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून २०१२ व २०१७ मधील महापालिका सदस्यांचे निवडून आल्याचे प्रमाणपत्र माहितीचा अधिकार कायदयान्वये मिळविले. अनेक सदस्यांनी त्यांच्या माहितीचा व अनुभवाचा अनमोल खजिना शब्दरुपाने व कागदोपत्री मला दिला. त्याविषयी लवकरच पुस्तक प्रकाशन करून ती उद्बोधक माहिती समाजापुढे मांडण्याचा मानस आहे. मात्र, अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या संपर्क होऊ शकला नाही. देशात अशाप्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच झाला. त्यामुळे त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे....................

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड