शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत दोन गटांत तुंबळ हाणामारी; सहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 13:40 IST

फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी लोखंडी रॉड तसेच लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

पिंपरी : दोन गटांमध्ये वाद होऊन तुंबळ हाणामारी झाली. यात लोखंडी रॉड, दांडके, फायटरने मारहाण केली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी येथे सोमवारी (दि. २९) रात्री ही घटना घडली.

पहिल्या प्रकरणात अनिकेत अनिल जाधव (वय १९, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ३०) फिर्याद दिली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल रणखांबे, आकाश रणखांबे, संजय कांबळे, दीपक जावळे, इश्वर कांबळे, अजय लोंढे (सर्व रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यासह बाळा कांबळे आणि बाळा जावळे (दोन्ही रा. ‍विठ्ठलनगर, पिंपरी) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा मित्र रोहित शिंदे हे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दारू पित होते. त्यावेळी फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी लोखंडी रॉड तसेच लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी जबर जखमी झाले.

दुसऱ्या प्रकरणात आकाश युवराज रणखांबे (वय २६, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) याने मंगळवारी (दि. ३०) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत अनिल जाधव, सुशांत अनिल जाधव, रोहित शिंदे, टॉकनचा भाऊ (सर्व रा. विठ्ठलनगर, पिंपरी), आतुल डोंगरे (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) व त्यांचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रोहित शिंदे याला अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे चुलते विष्णू मुंजाजी रणखांबे यांच्या घरी जेवण करायला जात होते. त्यावेळी आरोपी अनिकेत जाधव व रोहित शिंदे यांनी फिर्यादीला लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीचा भाऊ त्यांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात घेऊन गेला असता आरोपींनी विशाल रणखांबे याला वायसीएम हॉस्पिटलमध्ये फायटरने मारहाण करून जबर जखमी केले. फिर्यादीचे मामा संजय बाबूराव कांबळे हे फिर्यादीला भेटायला हॉस्पिटलमध्ये येत असताना आरोपींनी त्यांनाही फायटरने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक