शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गाव तसं चांगलं... तब्बल ४२७ घरे महिलांच्या नावावर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 19:56 IST

घरांच्या सातबारा उताऱ्यावर महिलांची नावे लावण्याचा ग्रामपंचायतीने चांगला निर्णय घेतला.

ठळक मुद्देग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम : सावित्रीच्या लेकींना घरांची मालकी 

वडगाव मावळ : कान्हे ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यानंतर जांभूळ-सांगवी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. नऊ वर्षात जांभूळ ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात मावळ तालुक्यात प्रथम व जिल्हात तृतीय क्रमांक पटकविला. महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेत प्रथम क्रमांक मिळविला आणि आदर्श सरपंच व आयएसओ प्रमाणपत्र मिळविले. त्यापुढे आणखी एक पाऊल टाकत तब्बल ४२७ घरे पुरुषांबरोबर महिलांच्या नावावर करून आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. कान्हे, जांभूळ, सांगवी आणि नायगाव या गावांसाठी गेल्या ५० वर्षांपासून कान्हे ग्रामपंचायतीत होती. मात्र कालांतराने या गावांची लोकसंख्या वाढली. विकासासाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची गरज भासू लागली. त्यासाठी जांभूळचे तत्कालीन सरपंच संतोष जांभूळकर व त्यांच्या सहकाऱ्यांसह ग्रामस्थांनी प्रयत्न केले. त्यातून तीन आॅगस्ट २००९ रोजी कान्हे ग्रामपंचायतीचे विभाजन करून जांभूळ व सांगवी गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. तेव्हापासून नऊ वर्षांत ग्रामपंचायतीने पाणी योजना, शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर, रस्ते व विविध प्रकारची कोट्यवधींची विकासकामे केली. गावाचा कायापालट केल्याने वेगवेगळे पुरस्कार मिळाले. त्यापुढे आणखी एक पाऊल टाकत पतीबरोबर महिलांच्या नावावर घरे केली. गावातील सर्व घरांना एकाच प्रकारचा रंग दिला.....................विकासकामात राजकारण नाही तालुक्यातील आयएसओ होणारी पहिली ग्रामपंचायत जांभूळ असून, त्याचबरोबर बालवाडी, शाळादेखील आयएसओ झाल्या आहेत. माजी आदर्श सरपंच संतोष जांभूळ, मीना जांभूळकर, विद्यमान सरपंच अश्विनी ओव्हाळ, उपसरपंच अंकुश काकरे, सदस्य दत्ता जांभूळ, चंद्रकांत औव्हाळ, नंदा गराडे, मनिषा लालगुडे, रखमाबाई पवार यांच्यासह माजी सदस्यांनी एकत्र येऊन आत्तापर्यंत सुमारे दहा कोटींची विकासकामे केली आहेत. विद्यमान सरपंच अश्विनी औव्हाळ व माजी सरपंच मीना जांभूळकर म्हणाल्या, घरांच्या सातबारा उताऱ्यावर महिलांची नावे लावण्याचा ग्रामपंचायतीने चांगला निर्णय घेतला. यामुळे महिलांचे हक्क व अधिकार अबाधित राहून घरामध्ये सन्मानाची वागणूक मिळू शकते. पत्नीच्या सहीशिवाय पतीला काहीच करता येणार नाही. हा आदर्श दुसऱ्या ग्रामपंचायतींनी घ्यावा. 

टॅग्स :PuneपुणेHomeघरgram panchayatग्राम पंचायत